जीवनाचे 4 नियम

 ( #Monday_Motivation)

नियम 1 - तुमचं काम हे केवळ तुमच्या कामापुरतंच नाहीये, तर, तुमच्या कामामुळेच तुमच्या जीवनाचं गाडं चालणार आहे. किंबहुना, तुमच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही करत असलेलं काम हे लक्षात ठेवा.

दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, तुमचं काम, तुमच्या आर्थिक बाबी, तुमची मुलं हे सगळे मिळून तुमचं जीवन आहे आणि म्हणूनच या सगळ्याच बाबी तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच, जेव्हा तुम्ही स्वतःची प्रगती साधण्याच्या दृष्टीने जीवनाचा विचार करायला लागाल, त्याबरोबरच तुमच्या जीवनातील या अन्य सर्व घटकांचीही प्रगती होत जाईल.

नियम 2 - जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघाल तेव्हा तुमच्या अडचणी क्षुल्लक होत जातील..

अनेक मोठ्या लोकांकडून हे वाक्य आजवर शेकडो वेळा तुम्ही ऐकलं असेल. क्रीस डो नावाच्या एका शिक्षकाने नुकतंच हे वाक्य त्यांच्या एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, या शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलचे तब्बल मिलीअन सबस्क्राईबर्स आहेत. एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं गेलं की तुम्ही १ बिलिअन सबस्क्राईबर्स चं ध्येय का ठरवलत? तेव्हा त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा ते पूर्ण करण्यामध्ये तुम्ही खुप वेळेसाठी इतके व्यस्त होता की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा कोणता मित्र तुमचा वाढदिवस विसरला अशा किरकोळ गोष्टींमध्ये लक्ष घालायला तुमच्याकडे वेळच उरत नाही.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

नियम 3 - तुमचं जीवन हे तुमच्यापुरतं नाहीये, तर तुमचं जीवन हे त्या प्रत्येक जीवनाशी जोडलेलं आहे जे तुमच्या सहवासात येतात, तुमच्या जीवनात येतात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जे तुमच्या जीवनाचा भाग असतात त्या सगळ्यांशी तुमचं जीवन जोडलं गेलेलं आहे.

म्हणूनच, तुमची ध्येय, तुमची उद्दीष्ट ही पुनःपुन्हा तपासून बघा. ती तुमच्यापुरती मर्यादीत आहेत का? याचे परिक्षण करा.

उदाहरणार्थ - अब्जावधी फॉलोअर्स मिळवळे, एखादं पारितोषिक वा सन्मान मिळवणे, कोट्यवधी रूपये कमावणे वगैरे ..

जरीही तुम्ही ही वैयक्तिक उद्दीष्ट कधी ना कधी परिश्रमपूर्वक साध्य केलीत तरीही तुम्ही त्याबाबत आणि स्वतःबाबत कधीही समाधानी असणार नाही कारण, तुम्हाला ती आणखी आणखी हवीशी वाटत जाईल. अखेरीस तुमचं तुम्हालाच जाणवेल की हा एक अंत नसलेला खड्डा आहे.

का ?

कारण..

आपलं जीवन हे स्वतःच्या अपेक्षांपुरतंच मर्यादीत नाहीये तर जोवर आपण इतरांना आनंद देत नाही तोवर आपल्याला आनंद मिळत नाही हा माणसाचा खरा स्वभाव आहे.

जेव्हा तुम्ही इतरांना सेवा द्याल, इतरांना आनंद द्याल तेव्हा तुमच्या मनातून चिंता, एकटेपणा, औदासिन्य आणि अक्षमतेच्या सगळ्या भावना दूर पळून जातील.

नियम 4 - आपण तेव्हाच सर्वोत्तम कार्य करू शकतो जेव्हा आपण एकमेकांची काळजी घेतो आणि आपली काळजी घेतली जाते. या नियमातला सुरूवातीचा भाग तर तुमच्या लक्षात आलाच असेल परंतु हा दुसरा भाग, त्याकडे लक्ष द्यायला हवं.

लक्षात ठेवा, जोवर तुम्ही स्वतः खूश नसाल तोवर तुम्ही इतरांना कदापि खूश ठेवू शकत नाही. जोवर तुमचा कप रिकामा असेल तोवर तुम्ही इतरांचा कप भरूच शकणार नाही. म्हणून जोवर तुमच्या ओंजळीत देव भाग्याचं, आनंदाच दान देत नाही, तोवर तुम्ही स्वतःला अशाच लोकांच्या संपर्कात ठेवा, जे तुमची काळजी घेतात, तुमच्यावर प्रेम करतात. अशी माणसं जी तुम्हाला पोषक वातावरण देतात आणि तुम्हाला आधार देतात. त्यामुळेच तर तुम्ही या जगातली एक चांगली शक्ती बनू शकता. म्हणूनच, स्वतःची काळजी घ्या.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com