There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जॉर्ज ओडॉन (Jorge Odon) हा अर्जेंटिना मधील बुनोस एअरेस मध्ये एक गॅरेज चालवत होता.
2006 मध्ये, त्याच्या एका मेकॅनिकने यूट्यूबवर पाहिलेली एक युक्ती दाखवली. ती होती, रिकाम्या वाइनच्या बाटलीत आत गेलेल्या बुचला (cork) बाहेर कसे काढायचे.
इतर मेकॅनिक्सनी बाटली हलवून पाहिली, चिमटा किंवा स्क्रू ड्रायव्हरने बुचला पकडण्याचा प्रयत्न केला, पण काहीही काम झाले नाही.
त्या मेकॅनिकने दाखवले की ते कसे करायचे: एक प्लास्टिकची पिशवी लांब आणि पातळ होईपर्यंत पिळली, ती बाटलीच्या मानेत टाकली, आणि पिशवीत फुंकर मारली. पिशवी फुगल्यावर ती बुचला बाटलीच्या काचेला आतून चिकटवून ठेवते.
नंतर हळूच पिशवी बाहेर ओढल्यावर, पिशवी बुचला धरून ठेवते आणि बुच बाहेर येते.
सुरुवातीला जॉर्जला वाटले होते की ही ट्रिक काम करणार नाही. पण ती चालली.
ही युक्ती चांगली आहे ...आणखी कशासाठी तरी उपयोगी पडू शकते, असे त्याला नंतर वाटले.
हा विचार त्याच्या मनात घोळत राहिला, आणि एक रात्री तो पलंगावर बसलेला असताना त्याला महिलांच्या प्रसूतीबद्दल विचार आला.
https://www.facebook.com/share/p/16A56Hqvpy/
त्यावेळी जॉर्जला नक्की आकडेवारी माहित नव्हती, पण त्याला माहित होते की ही एक समस्या आहे.
आकडेवारी अशी आहेत: वर्षाला 1.37 कोटी महिलांना प्रसूतीदरम्यान अडचणी येतात.
56 लाख बालके मृत जन्माला येतात किंवा लवकरच मरतात - 2 लाख 60 हजार महिला प्रसूतीदरम्यान दगावतात.
विकसित देशांमध्ये, प्रसूतीदरम्यान अडचण आल्यास सुरक्षित उपाय म्हणजे सिझेरियन सेक्शन (शस्त्रक्रिया).
पण जगाच्या बहुतांश भागांमध्ये, एकमेव उपाय म्हणजे चिमटा (forceps) किंवा सक्शन कप (थ्री इडियट्स मध्ये दाखविलेला तसा !). चिमटे मोठे, गोल आकाराचे बाळाला डोक्याकडे पकडण्याचे साधन आहेत, जे डिझाईन चारशे वर्षांपासून बदललेले नाही.
चिमट्यांचा वापर केल्याने कधीकधी रक्तस्राव, डोक्याची कवटी दुःखावणे किंवा पाठीचा कणा मुरगळणे असे प्रकार होऊ शकतात. तसाच प्रकार सक्शन कपचा होतो. डॉक्टर निष्णात असणे त्यासाठी खूपच गरजेचे असते.
जॉर्जने आपल्या मुलीची एक खेळण्यातली बाहुली घेतली आणि प्रयोग करायला सुरुवात केली.
त्याने पॉलिथिनची पिशवी आत टाकण्याची एक पद्धत विकसित केली, जी बाळाच्या डोक्याभोवती जाईल आणि मग हळूच बाहेर काढली जाईल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
एका ओळखीच्या प्रसूतीतज्ञाकडे त्याने ही कल्पना मांडली. त्याने जॉर्जची ओळख बुएनोस एअरेस येथील प्रमुख प्रसूतीतज्ञाशी करून दिली. एका मेकॅनिकचं काय ऐकायचं याबद्दल तो सुरुवातीला संशयग्रस्त होता, पण त्याने भेट ठरवली. त्याला ही कल्पना आवडली.
त्याचवेळेला डॉ. मेरीआल्डी, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख एका समारंभासाठी बुएनोस एअरेस मध्ये आले होते. त्यांना ही संकल्पना सांगितली तेव्हा ते सुद्धा सुरुवातीला संशयग्रस्त होते. पण त्यांनी जॉर्जचे बोलणे ऐकण्यास सहमती दिली.
दहा मिनिटांची मिटिंग दोन तासांची झाली, त्यानंतर त्यांनी डेस मोइन्स विद्यापीठात भेटीची व्यवस्था केली. अधिक चाचण्या केल्यानंतर बेक्टॉन डिकिन्सन अँड कंपनीने या डिझाइनच्या निर्मितीसाठी 20 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.
हे तंत्रज्ञान वापरून झालेल्या ४७ डिलिव्हरीमध्ये जॉर्ज स्वतः हजर होता. पूर्वापार पद्धतीपेक्षा जॉर्जचे उपकरण अधिक प्रभावी ठरत आहे. त्याच्या या जबरदस्त कथेवर एक नाटकही बसवण्यात आले. ते नाटक बघून जॉर्जला अश्रूच अनावर झाले. काही वर्षांपूर्वी कोणी माझ्या आयुष्यावर नाटक बनवेल असे स्वप्नातही वाटले नसते ! असे तो म्हणाला.
एका प्रसूतीतज्ञाने चिमटे किंवा व्हॅक्यूम एक्सट्रॅक्टर (vacuum extractor) सुधारण्याचा प्रयत्न केला असता, पण अडलेल्या प्रसूतीसाठी एका मेकॅनिकने वेगळा विचार केला. कारण त्याने या प्रश्नाकडे जीवशास्त्रीय प्रश्न म्हणून नव्हे तर यांत्रिकी प्रश्न म्हणून पहिले. वेगळा विचार/दृष्टिकोन असा उपयोगी ठरतो. आणि आणखी काही वर्षांपूर्वी हे शक्य झाले नसते. कारण तेव्हा यूट्यूब नव्हते, त्याच्या मेकॅनिकने तो व्हिडिओ पाहिला नसता....तर आज हे उपकरण तयारच झाले नसते".
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !