There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
काल एक बातमी वाचली. जर्मनी सरकारने 6 वर्षांच्या मुलांसाठी निवृत्ती बचत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
या योजनेचा उद्देश लहान वयातच आर्थिक साक्षरता वाढवणे आणि दीर्घकालीन बचतीची सवय लावणे हा आहे.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरमहा 10 युरो (सुमारे ₹900) सरकारी योगदान मिळेल. 12 वर्षांच्या कालावधीत हे योगदान 1,440 युरोपर्यंत (सुमारे ₹1.3 लाख) जमा होईल.
हे पैसे केवळ बचतीसाठी न ठेवता, भांडवली बाजारात गुंतवले जातील. या गुंतवणुकीवर मिळणारा नफा निवृत्तीपर्यंत करमुक्त राहील. सध्या निवृत्तीचे वय 67 वर्षे आहे, त्यामुळे या फंडाला सुमारे 60 वर्षांचा वाढीचा कालावधी मिळेल.
विचार करा, साठ वर्षे चक्रवाढ व्याजाचा किती लाभ मिळेल.
या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक बचत नव्हे, तर लहान वयातच मुलांना आर्थिक नियोजन, चक्रवाढ व्याज, गुंतवणूक यांसारख्या संकल्पनांची ओळख करून देणे आहे. यामुळे भविष्यात आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि जबाबदार नागरिक नक्कीच घडतील.
जर्मनी मधील वयोवृद्धांची संख्या वाढत आहे आणि एवढ्या प्रगत देशांमध्येही निवृत्ती नियोजन न केलेल्या लोकांचे संख्या अधिक आहे. भारतात तर ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. मी स्वतः गेल्या काही महिन्यात सुमारे १५० कुटुंबांसोबत त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दल बोललो. बहुतांशी लोकांचे retirement planning नव्हते किंवा पुरेसे नव्हते.
आज आपला देश तरुणांचा देश आहे पण जेव्हा ही मोठी लोकसंख्या निवृत्त होईल तेव्हा त्यांचा भार सरकार वर आणि पर्यायाने करदात्यांवर पडणार आहे. आज अगदी ३५ वर्षांच्या व्यक्तीबरोबर बोलतो तेव्हापण निवृत्ती नियोजन हा विषय त्यांना खूप दूरचा वाटतो.
जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर आजच यावर कृती करा. सुरुवात केली असेल तर आपण योग्य नियोजन केले आहे याचा review करा. आणि जर्मनी प्रमाणेच आपल्या मुलाना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न करा.
आर्थिक साक्षरतेची सुरुवात नेटभेट च्या या खास विनामूल्य कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन करा.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स