"दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद" - (Part 1)


दीर्घकालीन विचार करण्याचे अनेक फायदे आहेत. कमी पगार असलेल्या एका सफाई कामगारालाही या यामुळेच करोडपती (millionaire) होता आले !

रोनाल्ड जेम्स रीड यांची गोष्ट सांगतो. ते १९२१ साली जन्माला आले आणि ९२ वर्षांचे असताना त्यांचं व्हेरमॉण्ट , USA मधल्या त्यांच्या छोट्याशा घरात निधन झालं. त्यांच्या कुटुंबातले ते पहिले शाळा शिकलेले व्यक्ती होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी "सैनिक" म्हणून काम केलं. त्यानंतर २५ वर्षं त्यांनी पेट्रोल पम्प वर काम केलं. एक वर्ष निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी १७ वर्षं सफाई कामगार म्हणून काम केलं.
तुम्हाला वाटत असेल की या माणसाबद्दल वाचण्यात वेळ का घालवायचा? पण त्यांच्या मृत्यूनंतरची गोष्ट खरंच धक्कादायक आहे.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं नाव अचानक चर्चेत आलं. आणि त्याला एक चांगलं कारण होतं. या सफाई कामगाराने एका ग्रंथालयाला $1.2 million आणि एका हॉस्पिटलला $4.8 million एवढी रक्कम दान केली होती ! त्यांच्या एकूण संपत्तीच्या ७५% भाग त्यांनी दान केला. त्यांची एकूण संपत्ती होती तब्बल $8 million - म्हणजे २०१४ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या वेळी जवळपास ५० कोटी रुपये!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================

हा एवढा पैसा त्यांनी जमवला कसा?

त्यांना lottery लागली नव्हती किंवा कुणा श्रीमंताने भरघोस टीपही दिली नव्हती. त्यांनी ही संपत्ती blue-chip stocks मध्ये गुंतवणूक करून जमवली. (blue-chip stocks म्हणजे मोठ्या, नावाजलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर कंपन्यांचे shares).

त्यांनी लवकर श्रीमंत होण्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवले नाहीत. त्याऐवजी त्यांनी एक सावकाश पण सुरक्षित मार्ग निवडला. तसा हा मार्ग कंटाळवाणा वाटतो पण अकाउंट मध्ये ५ ० कोटी रुपये येणार असतील तर कंटाळवाणा वाटेल का ?

अशा गरीबातून श्रीमंत होण्याच्या गोष्टी एका रात्रीत घडत नाहीत. यासाठी वर्षानुवर्षे शिस्तबद्ध गुंतवणूक करावी लागते. खूप हुशारी नाही, खूप बुद्धिमत्ता नाही - तर फक्त शिस्त आणि धीर.

यावर विश्वास बसत नाही ना? जगातले सर्वात प्रभावी इन्व्हेस्टर Warren Buffett यांनी म्हटलं आहे:

"चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला खूप हुशार असण्याची गरज नाही. तुमचा IQ १६० असेल, तर त्यातले ३० points दुसऱ्याला विकून टाका - कारण investment साठी त्याची गरज नाही. तुम्हाला फक्त योग्य मानसिकता हवी.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
म्हणूनच रीड सारख्या सफाई कामगाराची गोष्ट जगात कुठेही घडू शकते. मग ती तुमच्या - आमच्या बाबतीत का घडू नये? जरी तुमचं उत्पन्न कमी असलं, तुम्ही तरुण असाल, तरीही.

investment साठी सर्वात योग्य वेळ आहे - आत्ताच. मग करताय ना सुरुवात !

पुढच्या भागात थोडी सविस्तर आकडेवारी पाहून ठरवूया.....गुंतवणुकीसाठी लवकर सुरुवात करणे का आवश्यक आहे ते !


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com