'तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे ?'  'Who will cry when you die ?' 

(#Saturday_bookclub)


नमस्कार मित्रांनो,

 आज आपण जाणून घेणार आहोत 'रॉबिन शर्मा' लिखित एका पुस्तकाबद्दल, ज्याचं नाव आहे, 'हू वुईल क्राय व्हेन यू डाय ..?'

'तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे ?' ही या पुस्तकाची मराठी आवृत्ती ! 

या पुस्तकात अतिशय साध्या सोप्या आणि हलक्या-फुलक्या भाषेत लेखकाने जीवनाचं एक मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे की अगदी अल्पावधीतच या पुस्तकाला वाचकांकडून आजही उदंड प्रतिसाद मिळत आहे.
माणसाने जीवन कसं जगावं जेणेकरून तो वा ती मरणानंतरही लोकांच्या स्मरणात राहतील याविषयी या पुस्तकात लेखकाने आपले प्रबोधन केलेले आहे. लेखकाने या पुस्तकात अशा 101 टीप्स दिल्या आहेत ज्या वाचून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे जीवन फुलवू शकता. वरवर पाहिलं तर या टिप्स इतक्या सोप्या आहेत आणि सहज करण्याजोग्या आहेत परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनात याकडे पूर्ण लक्ष देत नाही आणि आयुष्यातले सुखाचे क्षण आपल्या हातून सहज निसटून जातात. हे पुस्तक वाचता वाचता तुम्हाला नानाविध उदाहरणांमधून आपोआपच लक्षात यायला लागतं ते जीवनात आपला नेमका फोकस कुठे असावा आणि कोणत्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करावं. बरेच वेळेला असं होतं की आपला फोकस हलतो आणि त्यामुळे आपण खरं म्हणजे आपल्याला जे बनायचंय किंवा आपल्याला जे काम करायचं त्यापासून आपण केव्हाच भरकटून जातो. मधली बरीच वर्ष आपल्या हातून निसटून जातात आणि मग केव्हातरी आयुष्याच्या रेट्यात आपल्याला आपल्या हातून काय निसटून गेलं हे जेव्हा आपल्याला प्रकर्षाने जाणवतं तेव्हा आपल्या हातून वेळही निघून गेलेली असते आणि मग अनेक जण फक्त हळहळत राहण्या वाचून काहीच करू शकत नाही. हे असं होऊ नये म्हणून माणसाने विचारपूर्वक आपल्या जगण्याचे उद्दिष्ट त्या दिशेने आपली वाटचाल करत राहिलं पाहिजे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================


या पुस्तकातील काही ठळक मुद्दे जे प्रत्यक्ष जीवनात अवलंबून आपण आपलंही जीवन अत्यंत सुखकर असं घडवू शकतो -

1. स्वतःवर प्रेम करा, पण स्वतःशी कठोरताही बाळगा -
याचा अर्थ असा की स्वतःवर प्रेम करताना, स्वतःतील दोष दूर करण्यासाठी मात्र नेहमी कठोर असलं पाहिजे. म्हणजेच, शिस्तबद्ध जीवन जगा, छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडत नाहीत पण त्या करणं फार महत्त्वाचं आहे, त्या गोष्टींचा कितीही कंटाळा आला तरी त्या टाळू नका. वक्तशीरपणा अंगी बाळगा. यामुळे तुमच्यातील दोष हळूहळू दूर होतील आणि तुम्ही एक अधिक प्रभावी व्यक्ती व्हाल.. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला खरंतर हीच प्रभावी व्यक्ती म्हणून स्वतःला घडवायचं होतं.

2. नेहमी खरं बोला -
लेखक सांगतो, की आपण सगळेच कधी ना कधी खोटं बोलतोच .. पण तुम्ही जर स्वतःशी खरं बोललात तर तुमच्या निम्म्या अडचणी दूर होतील. कारण, हेच बघा ना, आपण ठरवतो, की मी उद्यापासून सकाळी लवकर उठणार आहे पण प्रत्यक्षात आपण तसं वागतच नाही, म्हणजेच काय आपण स्वतःशी खोटं बोलत रहातो.. हेच खोटं बोलं आपण थांबवायला पाहिजे असं लेखक म्हणतो. स्वतःला ती सवय लावण्यासाठी आपण चक्क सात दिवसांचे खरं बोलण्याचे उपास करून पहायला हरकत नाही. म्हणजे, सात दिवस अजिबात म्हणजे अजिबात खोटं बोलायचं नाही हे ठरवायचं आणि त्यानुसारच वागायचं असं करून पहा असं लेखक सांगतो.
मित्रांनो, हे पुस्तक किती रंजक आहे याची कल्पना तुम्हाला यावरून आली असेलच !


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com


पुस्तकाची आवृत्ती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://salil.pro/whowillcry