डॉ.एपीजे अब्दुल कलामांची 11 प्रेरणादायी वाक्य (#Monday_Motivation)

1. तुमच्या पहिल्या यशानंतर ढेपाळू नका, कारण, जर तुम्ही पुन्हा तसे यश मिळवू शकला नाहीत तर लोकांना वाटेल की तुमचं पूर्वीचं यश हे तुम्हाला केवळ नशीबानं मिळालं होतं.

2. तुमचे उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर तुम्हाला केवळ आणि केवळ तुमच्या ध्येयाप्रती झोकून देऊन काम करायला हवं हे लक्षात ठेवा.

3. जर तुम्ही अपयशी झालात तरीही प्रयत्न सोडू नका कारण, FAIL म्हणजे First Attempt In Learning

4. आपल्या सगळ्यांकडे समान बुद्धीमत्ता आणि गुणवत्ता नसली तरीही सर्वांना स्वयंविकासासाठी संधी मात्र समान आहेत.

5. सतत क्रीयाशील रहा! जबाबदारी घ्या! तुमचा ज्यावर विश्वास आहे त्या गोष्टींसाठी काम करत रहा. जर तुम्ही तसं केलं नाहीत तर तुम्ही इतरांना तुमचं नशीब झुकवण्यासाठी संधी देत आहात हे लक्षात ठेवा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

6. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि त्या बदलल्यानंतर नक्कीच तुमचं भविष्य बदलणार यात शंका नाही !

7. आपल्याला सगळ्यांसारखं होण्याची क्षमता नाही, परंतु आपल्या क्षमतांना समान संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आपल्यात आहे.

8. एखाद्याला हरवणं खूप सोपं असतं, पण एखाद्याला जिंकणं फार अवघड असतं.

9. जर तुम्हाला सूर्यासारखं उजळून जायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळावंही लागेल हे लक्षात घ्या.

10. तुमच्याकडून झालेली 'या आधीची चूक' हीच तुमचा उत्तम गुरू असते.

11. माणसाला जीवनात अपयश येणं हे फार महत्त्वाचं असतं कारण त्यामुळेच तर त्याला यशाची गोडी चाखता येते.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com