There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्ये आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवू शकतो तर स्वतःवर दाखवलेला अविश्वास सहज आणि सोप्या गोष्टी सुध्दा एखाद्यासाठी कठिण बनवू शकतो. त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे फार महत्त्वाचे आहे, तो वाढवण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
१. आपली ऊर्जा दूसर्याला प्रभावित करण्यासाठी घालवू नका.
आपण जे आहोत ते आहोत उगाच दूसर्याला प्रभावित करण्यासाठी किंवा खुष करण्यासाठी आपण कोणीतरी दूसरे असल्यासारखे वागू नका. जर आपण जसे आहोत तसे इतरांनी आपल्याला स्विकारावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्विकारलं पाहिजे. कारण आपण प्रत्येक वेळी मुखवटा घालून फिरु शकत नाही, कधीकधी ना कधी हा मुखवटा गळून पडतोच. आपण जसे आहोत तसे कदाचित सर्वांना आवडणार नाही किंवा आपल्या मुखवट्याप्रमाणे त्याला प्रशंसा मिळणार नाही. पण आपल्याला हे विसरुन चालणार नाही की प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते आणि आपण प्रत्येकाला खुष करु शकत नाही. एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आपण जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच आनंद नष्ट करत असतो. त्यापेक्षा आपण जसे आहोत तसेच सर्वासमोर आलो तर आनंदाबरोबरच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखिल वाढतो.
२.आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील अशा व्यक्तिंच्या सहवासात रहा.
आपण जशा लोकांच्या सानिध्यात राहतो त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व बनते. इतर लोक ज्यांचा आदर करतात अशा लोकांच्या सहवासात राहीलात तर तुम्ही आपोआपच इतरांच्या आदरास पात्र ठराल. जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारायचे असेल तर अत्यंत हुशारीने आपण कशा माणसांसोबत वेळ घालवावा हे आपल्याला ठरवावं लागेल. असे केल्याने तुमच्या सवयी सुधारतीलच पण आत्मविश्वास देखिल वाढेल.
३. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
नकारात्मक विचार नकारात्मकता वाढवतात. नकारात्मक विचार असे आहेत जे आपण ज्याच्याबद्दल नकारात्मक आहोत त्याला कमी आणि आपल्याला जास्त हानिकारक ठरतात. त्यामुळे दूसर्याबद्दल आणि स्वतःबद्दल नकारत्मक विचारांना आपल्या मनात थारा कधीच देवू नका. त्यापेक्षा विचारांमध्ये सकारात्मकता आणून वाईटाला चांगल्या गोष्टीमध्ये, दू:खाला सुखामध्ये बदला.
४. दूसर्यांसाठी जगा, त्यांच्या आनंदात आनंदी रहा.
नि:स्वार्थ भावना आपल्यामध्ये आनंद आणि आत्मविश्वास वाढवते. स्वार्थीपणा आपल्यातील माणूसकीला जगायला वाव देत नाही. आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात झालेला चांगला बदल किंवा आलेला आनंद आपल्याला आत्मविश्वास आणि आपल्या कामाप्रति समाधान देऊन जातो. एखाद्याचे आयुष्य आपण योग्य मार्गाला वळवू शकलो या गोष्टीमुळे आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वाला बळ मिळते.
५. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळेची मदत घ्या, वेळ वाया घालवू नका.
दूसरी कोणतीही व्यक्ति तुम्हाला कमी समजू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर खुप मेहनत घेत असाल आणि स्वतःला कमी समजत नसाल. तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ आहे असे तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही समाधानी होऊ शकता. जर तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर तुमचा वेळ आणि कष्ट खर्च करत असाल तर तम्हाला पश्वात्ताप होणार नाही. जर तुमच्या वेळेला आणि जगण्याला अर्थ यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगले काम केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल मग त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते करा. लक्षात ठेवा चांगले काम आत्मविश्वास आणि आळस पश्वात्ताप देतो
६. स्वतःची दया काढणे आणि स्वतःची माफी मागणे थांबवा.
आपल्या कडून चूक होईल म्हणून काम न करण्याची कारण देणे चूका करण्यापेक्षा अधिक वाईट आहे. स्वतःच्या कामासाठी, चूकांसाठी स्वतः जबाबदारी घ्या. काम न करण्यासाठी कारणं देऊ नका, दूसर्याकडून सहानभूतीची अपेक्षा ठेवू नका. आपण स्वतःला घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल.
७. नकार द्यायला शिका.
तुम्हाला जे सांगितलय ते सर्व करण्यासाठी तुम्ही बांधिल नाही आहात हे लक्षात घ्या. खासकरुन अशा गोष्टी ज्यामुळे तुमचा स्वाभिमान दूखावला जाईल किंवा दूसर्याला त्याचा त्रास होईल. कधी कधी एखाद्या गोष्टीला नकार देणे ती गोष्ट निमूटपणे करण्यापेक्षा योग्य असते. त्यामुळे लक्षपूर्वक आपली कामे करा आणि नकार द्यायला शिका.
८. जिथे बोलायची गरज असेल आणि आपल्याबोलण्याने एखाद्याची मदत होणार असेल तिथेच बोला.
जिथे गरज नाही किंवा आपल्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही तिथे शांत राहीलेले कधीही चांगले. असं म्हणतात बोलण चांदी प्रमाणे असेल तर शांत राहणे सोन्याप्रमाणे आहे. योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलणे हुशारीचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमचे बोलणे काहीतरी बदल घडवून आणणारे किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे वाटत नसेल, तर शांत रहा.
९. जे आपल्याला गैरसोयीचे किंवा त्रासदायक वाटते अशी कामं करण्यासाठी लाजू नका.
यश आणि तुमच्यामध्ये नेहमी भीती उभी असते. अशा वेळी थोडीशी हिंमत दाखवून एखादी गोष्ट करुन पहा कारण अनुभव अपयशापेक्षा कधीही महत्त्वाचा असतो. जितकी जास्त तुम्ही अशी कामं कराल ज्याची तुम्हाला भीती वाटते तितकी तुमची भीती कमी होईल आणि अशा गोष्टींना सहज हाताळण्याची क्षमता वाढेल. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास देखिल वाढेल.
१०. आत्मविश्वास वाढवण्यासाठी वाचा आणि आपले ज्ञान वाढवा.
माणसाची खरी संपती त्याच्याजवळ असलेलं ज्ञान आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक रहा. तुम्ही एखाद्याला तुमचा मुद्दा तेव्हाच पटवू शकता जेव्हा तुमच्या जवळ ज्ञान आणि अनुभव असेल. जर तुम्हाला स्वतःचा आत्मविशवास वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्ञान आणि अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे.
११. व्यायाम करा आणि शरिराची काळजी घ्या.
निरोगी मनासाठी निरोगी शरीर गरजेचे असते. तुमचा जर तुमच्या शरीरावर विश्वास नसेल तर तुम्ही इतरांमध्ये स्वतःवर आत्मविश्वास दाखवू शकत नाही. योग्य शरीर यष्टी आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे व्यायाम करा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. व्यायामामुळे शरीरयष्टी सुधारते आणि त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो.
१२. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःचा आदर करा.
एकांतातसुध्दा स्वतःला अशी वागणूक द्या जशी तुम्हाला इतरांनी द्यायला आवडेल. स्वतःचा आदर करा. खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही स्वतःसमोरच आत्मविश्वासाने उभे असाल. इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःला स्वतः आदर द्या. अयोग्य आणि वाईट गोष्टी करुन आपला आदर घालवू नका. स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरले जाऊ असे कोणतेही काम करु नका. इतरांकडून विश्वास आणि आदर हवा असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास दाखवा आणि स्वतःचा आदर करा.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com