There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सूफी संत रूमी यानी सांगितलेली 14 प्रभावी वाक्ये -
1. केवळ इतरांच्या जीवनाची कथा ऐकून भारावून जाऊ नका, तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाची कहाणी उकलून पहा.
2. तुमच्या निराशेचं मूळ हे तुमच्या उद्धटपणात आणि इतरांचं कौतुक न करण्याच्या क्षमतेत दडलेलं आहे.
3. जे केवळ डोळ्यांनी प्रेम करतात त्यांच्यासाठी एकमेकांचा निरोप घेणं सोपं असतं, पण जे खऱ्या मनानी प्रेम करतात, त्यांच्यात कधी दुरावा नसतोच.
4. तुमचं मन जो मार्ग दाखवतंय त्याच मार्गाने पुढे जा, तो मार्ग तुमची कधीच दिशाभूल करणार नाही.
5. जे तुम्हाला दुखावून जातं तेच तुमच्यासाठी वरदान असतं. अंधार हाच खरा तर तुमच्यासाठी उजेड असतो.
6. आकाशातल्या चंद्रावर नजर ठेवा, तळ्यातील चंद्रबिंबावर नाही !
7. असं शहाणपण मिळवा, जे तुमच्या जीवनाची गाठ उकलेल, असा मार्ग चोखाळा जो तुम्हाला पूर्णत्त्व देईल.
8. जगाच्या बागेला मर्यादा नाहीत, त्या केवळ तुमच्या मनालाच आहेत.
9. तुम्हाला चिंता वाटतेय कारण तुम्ही सतत सुसंवादाची अपेक्षा करत रहाता, तुम्ही मतभेदांची सवय करून घेतलीत तर तुम्हाला नक्कीच शांतता अनुभवता येईल.
10. आपल्या आत आपणच दडवलेले अद्भुततेचे झरे आपण बाहेर शोधत रहातो.
11. शांतता ठेवा, कारण शांततेचं जग हे आतमधून पूर्णपणे भरलेलं आहे.
12. जेव्हा ते कोणत्याही इमारतीची पुनर्बांधणी करतील, तेव्हा त्यांनी आधी जुनी इमारत पूर्णतः नष्ट केली पाहिजे.
13. अत्यंत संयमाने छोट्या छोट्या गोष्टीतील तपशीलांवरही लक्षं दिलंत आणि बारकाईने काम करत राहिलात तर निश्चितच सुंदर कलाकृती घडते, आकाशगंगेकडेच पहा ना ...!
14. "मला माहिती आहे .. तू थकला आहेस .. पण तरीही ये .. कारण हाच तुझा मार्ग आहे !"