5 AM Club 

(#Saturday_Bookclub)

रॉबिन शर्मा लिखीत 5 AM Club हे पुस्तक सेल्फ हेल्प कॅटेगरीतील एक उत्तम पुस्तक ठरलं याचं कारण या पुस्तकाने जगण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली आहे. अनेकांना प्रश्न असतो की पहाटे लवकर उठून नेमकं काय करायचं.. पहाटे लवकर उठण्याचे नेमके काय फायदे आहेत ..आणि याची उत्तरं न सापडल्याने अशी मंडळी नेहमीच लवकर उठण्याच्या विरोधात कडाडून मतं मांडताना दिसतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती सदा सर्वदा लाभे .. हीच म्हण प्रत्यक्षात कशी खरी आहे याचे सोदाहरण विवेचनच एकप्रकारे लेखकाने या पुस्तकात करून दाखवले आहे. 

पुस्तकाची कथा काहीशी अशी आहे, एका व्याख्यानादरम्यान एक निराश उद्योजक महिला आणि एक कंटाळलेला कलाकार यांची भेट होते. ते दोघेही आपल्यात सर्व क्षमता असूनही एकंदरीतच जीवनाला कंटाळलेले असतात. ते आपसात बोलत असतानाच तिथे एक गरीब माणूस येतो, ज्याचा वेष खरंतर गरीब असला तरीही त्याच्या हातात मात्र तब्बल एक लाख रुपयांचं घड्याळ असतं. त्याच्याशी बोलायला लागल्यावर त्यांना समजतं की हा माणूस गरीब नाही,उलट हा तर बिलियोनेअर आहे पण हा गरीबासारखे कपडे घालतो कारण त्याला तो कुठून आलाय हे लक्षात रहावं.. गप्पांच्या ओघात हा श्रीमंत माणूस त्या दोघांना एक सिक्रेट सांगतो, ते म्हणजे पहाटे 5 ला उठल्यानेच मी ही श्रीमंती मिळवू शकलो असे तो म्हणतो, हे ऐकून त्या दोघांना आश्चर्य वाटतं. दुसऱ्याच दिवशी तो त्या दोघांना पहाटे पाच वाजता भेटायला बोलावतो नि आपल्या प्रायव्हेट जेटवरून सफरीला नेतो.. दरम्यान हे पहाटे पाच तं काय सिक्रेट आहे तेही तो त्यांना सांगतो.

काय असतं ते सिक्रेट ..?
तो श्रीमंत माणूस सांगू लागतो.. दररोज पहाटे 5 ला उठल्याने
1. माझी कल्पकता वाढली
2. माझ्यातली ऊर्जा दुप्पटीने वाढली
3. आणि माझी उत्पादन क्षमता तिप्पट वाढली.
हे कसं झालं.. ?


एरवी आपण सकाळपासूनच कामाला लागतो, दिवसभर निरनिराळ्या गोष्टीत आपलं लक्ष्य असतं. सकाळची कामं आटपता आटपता दुपारी जेवणाची वेळ केव्हा होते ते आपल्या लक्षातही येत नाही, आणि मग त्या वेळेपर्यंत आपला मेंदू पूर्णपणे थकून गेलेला असतो. तसंच, हे सगळं करण्यासाठी आपल्या मेंदूचा पुढला भाग ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात तो कार्यरत असतो आणि तो सततच्या श्रमाने थकून जातो परिणामी आपली उर्जा कमी कमी होत जाते.

हेच जेव्हा तुम्ही पहाटे पाचला उठता तेव्हा हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो लॉजिकल थिंकींग करत असतो, तो काहीसा निद्रावस्थेत असतो त्यामुळे तुमच्याकडे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते गोष्टींना आहे तसं स्वीकारण्याची.. शांतपणे समजून घेण्याची.. म्हणजेच, तुमच्यापैकी अनेकांना अतिविचार करण्याची जी समस्या असते त्याला या वेळात अटकाव लागतो. तुमचा पूर्ण फोकस स्वतःवर असतो आणि पूर्ण लक्ष्य तुम्ही स्वतःच्या कामावर केंद्रीत करू शकता, कारण तुम्ही ओव्हरथिंकींग करत नाही.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

चार खांब ज्यांची काळजी घ्यायला हवी -
1. चांगले विचार
2. चांगल्या भावना
3. चांगलं आरोग्य
4. आध्यात्मिक उंची


या चार खांबांवर आपलं जीवन आधारलेलं आहे. यामुळे या चारही बाबींची जेव्हा तुम्ही नीट काळजी घ्याल त्यानंतरच तुमचं जीवन छान फुलेल असंही त्या श्रीमंत माणसाने त्या आर्टीस्टला आणि त्या उद्योजक महिलेला सांगितलं.

20-20-20 फॉर्म्युला अवलंबा -
पहिले 20 मिनीट व्यायामासाठी खर्च करा. असा व्यायाम करा, ज्यातून घाम गळेल. पुढले 20 मिनीट स्वतःसाठी, स्वतःच्या मनातल्या भावनांकडे लक्ष देण्यासाठी खर्च करा. त्या भावना लिहून काढा, किंवा ध्यानधारणा करा आणि शेवटचे 20 मिनीट स्वतःच्या प्रगतीसाठी खर्च करा, यावेळेचा उपयोग करून काहीतरी नवं शिका. त्यासंबंधी काही वाचा, यूट्यूब व्हिडीओ पहा..

अशाप्रकारे तुम्ही 5 ए एम क्लबचे मेंबर व्हाल..आणि तुमच्या जीवनात फरक पडेल. तसंच, तो श्रीमंत माणूस म्हणाला, जशी दिवसाची सुरुवात महत्त्वाची असते तसंच दिवसाच्या शेवटचा एक तासही तितकाच महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. संध्याकाळी 8 वाजेनंतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ब्लू लाईटपासून स्वतःला दूर ठेवा, आणि रात्री दहा वाजता झोपून जा. जर झोपण्याची वेळ निश्चित ठेवाल तरच पहाटे लवकर उठू शकाल हे लक्षात घ्या. अशाप्रकारे, 5 एएम क्लबचे मेंबर होऊन तुम्हीही स्वतःचं जीवन बदलू शकता..

पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
https://salil.pro/5AMCLUB


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com