प्रत्येक सेल्सपर्सन मध्ये असलीच पाहीजेत अशी ५ कौशल्ये

सेल्स च्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अशी काही कौशल्ये आहेत ज्यामध्ये तुम्ही पारंगत असणे गरजेचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी त्या कामाची आवड आणि स्वतःला त्या कामासाठी पूर्णपणे झोकून देण्याची वॄत्ती असलीच पाहिजे.या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर सेल्स च्या या वेगवान शर्यतीत टिकून राहण्यासाठी लागणारी इतर कौशल्ये तुम्ही आत्मसात करु शकता आणि स्वतःमध्ये विकसीत सुध्दा करु शकता.

सेल्स करणार्‍या माणसांमध्ये खुप कमी अशी माणसं आहेत जे या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. अशी माणसं जे अगदी काहीही विकू शकतात आणि हेच करुन ते खुप कमवत सुध्दा आहेत. सेल्स करणार्‍या इतर माणसांमध्ये आणि या आघाडीच्या सेल्स करणार्‍या माणसांमध्ये काय फरक असेल अस तुम्हाला वाटतं ? खरतर सेल्स क्षेत्रात कमालीच काम करणार्‍या प्रत्येक माणसांमध्ये असलेले गुण आणि त्यांची काम करण्याची पध्दत ही सारखीच आहे.यावर आभ्यास करुन आपल्याला आशी ५ कौशल्ये मिळाली आहेत जी आपल्याकडे एक यशस्वी सेल्सपर्सन होण्यासाठी असलीच पाहिजेत.

१. ग्राहकांना त्यांना येणार्‍या अडचणींबद्दल बोलण्यात गुंतवा.

एक यशस्वी सेल्स करणारा माणूस नेहमी ग्राहकांशी बोलताना त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये येणार्‍या अडचणींबद्दल बोलण्यात अधिक रस दाखवतो. अलीकडे टॉप सेल्सपर्सन्स बद्दल आभ्यास करताना हे समोर आले आहे कि सेल्स मध्ये प्राविण्य असलेल्या व्यक्ती त्यांचे ग्राहक सामोरे जात असलेल्या अडचणींबद्दल बोलण्यावर जास्त भर देतात. ग्राहकांना त्याच्या बोलण्यामध्ये रस वाटावा म्हणून ते जास्तीत जास्त उलट प्रश्न हे त्यांच्या बिझनेस बद्दल विचारतात. हा एक गुण त्यांना इतर सेल्स करणार्‍या माणसांपेक्षा वेगळं करतो. म्हणजेच जर तुम्हाला आघाडीच्या सेल्स करणार्‍यांच्या यादीत यायचं असेल तर फक्त मी माझ प्रोडक्ट समोरच्या व्यक्तीला कसं विकू याचाच विचार करुन चालणार नाही तर तुम्हाला समोरचा व्यक्ती कोणत्या अडचणींना सामोरा जातोय ते सुध्दा समजून घेता आलं पाहीजे कारण शेवटी आपण त्यांना आपल प्रोडक्ट किंवा सर्विस विकत नाही आहोत तर आपण त्यांना त्यांच्या अडचणींवरचा उपाय विकत आहोत.

२. ग्राहकांवर खरेदी करण्यासाठी दबाव टाकू नका.

असे खुप सेल्सपर्सन्स आहेत जे आपल्या प्रोडक्ट बद्दल माहीती देत असताना शेवटी ग्राहकांवर ते प्रोडक्ट खरेदीकरण्यासाठी दबाव टाकतात. अस केल्यामुळे ग्राहकांच्या मनात खुप प्रश्न निर्माण होतात आणि " मी ते खरेदी केलं नाही तर काय?" या विषयावर वाद निर्माण होतो. त्यामुळे ते त्यांच्या खरेदी न करण्याच्या निर्णयावर अजूनच ठाम होतात. याउलट जे यशस्वी सेल्सपर्सन आहेत ते कधीच ग्राहकांवर त्यांच प्रोडक्ट खरेदी करा म्हणून भर टाकत नाहीत. त्यापेक्षा ते अडचणींबद्दल ग्राहकांशी समोरुनच बोलतात. ते पहीलं समजून घेतात अशी कोणती कारण आहेत ज्यामेळे ग्राहक कदाचीत हे प्रोडक्ट विकत घेणार नाही त्यांना त्याबद्दल कोणती काळजी आहे. त्यामुळे ग्राहक काही स्वतः बोलण्याआधी ते समोरुनच स्वतः असे प्रश्न विचारतात कि त्यांना ग्राहकांच्या अडचणी समजणं सोप जाईल आणि ग्राहकाचा विश्वास मिळवता येईल. ते समजून घेतात कि या ग्राहकाला प्रोडक्ट विकत घ्यायचे आहे किंवा नाही, त्यांची ती गरज आहे कि नाही पूर्ण संभाव्य असंभाव्य कारणांचा अभ्यास करुनच ते ठरवतात कि हे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना किती मेहनत करायची आहे, ग्राहकाशी कशा प्रकारे बोलायचं आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच प्रोडक्ट विकत घेण्यासाठी लोक जास्त पसंत करतात आणि हेच त्यांना या क्षेत्रात एक्सपर्ट बनवते.

३.बजेट बद्दल सगळ्यात शेवटी बोला.

अलीकडे झालेल्या सर्वे नुसार असं आढळून आलं कि इतर सेल्स करणार्‍यांच्या तुलनेत यशस्वी सेल्स करणारे लोक हे ग्राहकांशी त्यांच्या बजेट बद्दल किंवा पैशाच्या देवाणघेवाणी बद्दल सगळ्यात शेवटी बोलतात. याउलट जे इतर सेल्स करणारे लोक आहेत ते याच विषयावर सगळ्यात आगोदर किंवा जितक्या लवकर बोलता येईल तितक्या लवकर बोलतात. यशस्वी सेल्स करणारे लोक पहिल्यांदा त्यांच्या बोलण्यातून ग्राहकांशी नात निर्माण करतात, ते त्यांना प्रश्न विचारतात त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि मग अगदी शेवटी बजेट किंवा पैशाच्या देवाणघेवाणी बद्दल बोलतात.

४.ग्राहकांची यादी सातत्याने वाढवत रहा.

सेल्स करायचा म्हणजे ग्राहक वाढवायलाच लागणर हे स्पष्टच आहे पण यशस्वी सेल्स करणारी माणस तुम्हाला नेहमी ऑफिस मध्ये येऊन " आज मला सेल्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल?" हे विचारताना दिसत नाहीत ना ते महीनाभर फक्त बाहेर जावून ग्राहकांना सर्विस देत बसत जेणेकरून त्यांना अधिक ग्राहक मिळतील आणि मग त्या महीन्यात सेल्स करतच नाहीत , ना ते कधी तुम्हाला चढउताराच्या चक्रात अडकलेले दिसणार. यशस्वी सेल्स करणारे लोक सातत्याने त्यांच्या ग्राहकांच्या पाइपलाईनमध्ये भर कशी करता येईल यावर रोज भर देतात.
खरंतर प्रत्येक सेल्स करणार्‍या व्यक्तीला रोज किमान दोन किंवा जास्त ग्राहक रोज त्यांच्या ग्राहकांच्या पाइपलाईन मध्ये जोडता आले पाहिजेत. हे यशस्वी सेल्स करणार्‍या मानसिकतेचे सगळ्यात मोठे गणित आहे. आता पाइपलाईन मध्ये अशा अशा संधीची भर करणे हे प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्विसेस प्रमाणे वेगळेवेगळे असू शकते काही प्रोडक्ट किंवा सर्विसेस मध्ये रोज जास्त ग्राहक जोडावे लागत असतील तर काहींमध्ये तुलनेत कमी जोडावे लागतील. पण ते नेमके किती? असे किती ग्राहक तुम्हाला रोज जोडणे गरजेचे आहे जेणेकरुन तुम्ही या शर्यतीत टिकून रहाल हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला कामात सातत्य ठेवण्यावर भर द्यावा लागेल, कासवाप्रमाणे रोज छोटी छोटी पावलं उचलावी लागतील म्हणजे तुम्ही ग्राहकांच्या पाईपलाईन मध्ये ग्राहक जोडण्यासाठी सातत्य ठेवू शकाल.


५. काही पटलं नाही तरी भांडू नका.

यशस्वी सेल्स करणारे लोक त्यांच्या ग्राहकांची एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून त्यांच्याशी भांडण करत नाहीत. त्यापेक्षा ते अशा अडचणींबद्दल स्वतःच पहील बोलतात आणि ग्राहकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना ग्राहकाची एखादी गोष्ट खटकली तर ते त्यावर उलट उत्तर न करता "तुम्हाला अस का वाटत?" याबद्दल त्यांनाच विचारतात या पध्दतीने ते भांडणामध्ये न शिरता पुन्हा त्यांना त्यांच्या प्रोडक्ट बद्दल समजावण्याच्या प्रोसेस मध्ये जातात.भांडणामध्ये न घुसता हा एक चिंतन करण्याचा मार्ग आहे जिथे तुम्ही हे संभाषण पूर्णपणे दूसर्‍या बाजूने वळवू शकता हे समजून घ्या आणि हेच एक यशस्वी सेल्स करणारा माणूस करतो.

================
"सेल्स सिस्टिम मास्टरी" हा एक असा ट्रेनिंग प्रोग्राम जो तुम्हाला तुमची सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेससाठी उच्च दर्जाची सेल्स टीम तयार करण्यासाठी मदत करेल. हा सेल्स विषयक मराठी ऑनलाईन कोर्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा bit.ly/NetbhetSSM
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy