शेअर बाजारात उतरण्या आधी या पाच गोष्टींचा विचार करा.

शेअर मार्केट हे एक असं प्रभावी मार्केट आहे जिथे विक्री आणि खरेदी करणार्‍या दोन्ही बाजूंना नफा कमवण्याची उत्तम संधी असते. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूकीचा हा मार्ग उत्कृष्ट रिर्टन्स मिळवून देणारा आहे यात प्रश्नच नाही.तज्ञांच्या च्या म्हणण्यानुसार फक्त स्टॉक मार्केट मधलेच रिर्टन्स महागाई ला टक्कर देऊ शकतात.

हे सर्व जरी खरे असले तरी आपल्याला हे विसरुन चालणार नाही की शेअर मार्केट मध्ये जितका मोठा नफा होऊ शकतो तितकाच मोठा तोटा सुध्दा होऊ शकतो. त्यामुळे शेअर मार्केट काय आहे आणि ते नेमकं काम कसं करतं याची कल्पना तुम्हाला असणे फार महत्त्वाचे आहे.

👉 शेअर मार्केट मध्ये येण्याअगोदर सर्वप्रथम तुम्हाला ट्रेडींग च्या काही मुळ संकल्पनांची आणि शेअर मार्केट मध्ये कोणते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स असतात याची माहीती असणे गरजेचे आहे.

👉 त्यानंतर तुम्हाला आपल्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीची आणि कोणकोणत्या गोष्टी आत्ताच्या आर्थिक परिस्थितीवर प्रभाव टाकत आहेत याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

👉 त्यानंतर तुम्हाला गुंतवणूकीसाठी असं क्षेत्र निवडायचं आहे ज्या क्षेत्रात येणार्‍या काळात सकारात्मक वाढीची जास्त क्षमता आहे.

👉 आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला शेअर मार्केट मध्ये प्रवेशासाठी योग्य वेळ आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे नफा मिळवून बाहेर पडण्याची वेळ निवडायची आहे. (लक्षात ठेवा हे करत असताना अवास्तव रिर्टन्स चा अंदाज बांधू नका जसे की १००% किंवा त्यापेक्षा जास्त.)

👉 एक सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुमच्याकडे जे जास्तीचे पैसे आहे. ज्यांची तुम्हाला येणार्‍या नजिकच्या काळात गरज भासणार नाही आहे तेच पैसे स्टॉक मध्ये गुंतवा. कारण या क्षेत्रात याच क्षेत्रातील महानातील महान तज्ञ सुध्दा अयशस्वी झाले आहे. हे विसरुन चालणार नाही.

Happy Investing......

================
शेअर मार्केट म्हणजे नक्कि काय, ते काम कसे करते, टेक्निकल आणि फंडामेंटल ऍनलिसिस कसा करावा हे जाणून घ्यायचे असेल तर आज सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेल्या नेटभेटच्या ओळख शेअर मार्केटची ! Share Market Basics या मोफत ऑनलाईन वेबिनार मध्ये नक्की सहभागी व्हा.
www.netbhet.com/share-market-marathi-webinar
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com