जूने ग्राहक टिकवण्याचे ६ मार्ग

नमस्कार मित्रांनो,

बिजनेस मध्ये नवे ग्राहक मिळवण्यापेक्षा जुन्या ग्राहकांना पुन्हा विकणे हे जास्त फायदा देणारे असते. कारण ग्राहक मिळवण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागत नाही.
आज ह्या लेखांमध्ये आपण जुन्या ग्राहकांनाच पुन्हा पुन्हा कसे विकायचे ह्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया.

१. क्रॉस सेलींग

जर तुमची तुम्ही पुरवत असलेली सेवा किंवा उत्पादन असे असेल ज्याची ग्राहकांना सारखी गरज पडत नसेल, तर तुम्ही तुमच्या त्याच जून्या ग्राहकांना असे एखादे उत्पादन किंवा सेवा पुरवू शकता जे पहिल्या सेवा किंवा उत्पादनाला जोड देणारं असेल.
उदा. दागिन्यांच्या व्यवसायत ग्राहकाला एकदा दागिना खरेदी केल्यावर सारखं याव लागत नाही. पण तोच घेतलेला दागिना वेळोवेळी स्वच्छ करण्याची गरज त्यांना पडू शकते. इथे तुम्ही त्या ग्राहकांना दागिने स्वच्छ करणारी उत्पादने क्रॉस सेलींग म्हणून विकू शकता.

२. लॉयल्टी प्रोग्राम

तुमचे ग्राहक तुमच्याशी निष्ठावंत आहेत म्हणून त्यांना बक्षिस द्या. हे बक्षिस म्हणजे तुम्ही तुमच्याशी निष्ठावंत राहीलेल्या ग्राहकांना त्यासाठी कूपन्स देऊ शकता ज्यामधून ते तुमचं उत्पादन किंवा सेवा घेऊ शकतील किंवा अशा ग्राहकांना खरेदीवर काही सूट देऊ शकता. तुम्ही त्यांना तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग करणारे मार्केटर सुध्दा बनवू शकता.

३. संपर्कात राहून ग्राहकांना आठवण करून देणे.

इथे इ-मेल मार्केटिंग तुम्हाला फयदेशीर ठरु शकते. जर तुमचे उत्पादन किंवा सेवांचे काही माहीन्यांनंतर नुततीकरण करावे लगत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या ग्राहकांना वेळोवेळी ई-मेल पाठवून त्यासाठी आठवण करवून देऊ शकता.

================
नवीन ग्राहक मिळविण्यासाठी आणि जुने ग्राहक टिकविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग उपयोगी ठरते. नेटभेट चा 60 दिवसांचा पूर्णपणे मोफत डिजिटल मार्केटिंग कोर्स मराठीतून शिकण्यासाठी येथे क्लिक करा - http://bit.ly/NetbhetDMM
================

४. सबस्क्रीप्शन पॅकेज

यासाठी तुम्हाला पहीलं हे शोधावं लागेल की तुम्ही पुरवत असलेल्या उत्पादन किंवा सेवेचा कोणता भाग तुम्ही ग्राहकांसाठी सबस्क्रीप्शन प्लान मध्ये बदलू शकता. ते शोधल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राहकांना ही सबस्क्रीप्शन सेवा महीना किंवा आठवड्याच्या कालावधीसाठी सबस्क्रीप्शन पॅकेज म्हणून देऊ शकता.

५. ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव द्या.

हा आपले जूने ग्राहक टिकवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे यात काही शंकाच नाही. तुमच्या ब्रँड बरोबर व्यवहार करताना जर ग्राहकांना चांगला अनुभव आला तर ते ग्राहक तुमच्याकडेच परत येतील. त्यामुळे ग्राहकांना ते विसणार नाहीत असा तुमच्या ब्रँड बरोबरचा अनुभव द्यायला विसरु नका.

६. सारखे त्यांच्या डोळ्यासमोर रहा.

सोशल मिडीया आणि इ-मेल हे तुमच्या ग्राहकांच्या सतत डोळ्यासमोर राहण्यासाठी मदत करणारे सर्वोत्तम मार्ग आहेत. नेहमी कंटेंट मधून, विविध उपक्रमांमधून सोशल मिडीया आणि ई-मेल्स च्या माध्यमातून तुमच्या ग्राहकांना अर्थपूर्ण माहीती, शैक्षणिक माहीती पुरवत रहा, त्यामुळे तुमचे ग्राहकांशी असलेले नाते मजबूत होण्यासाठी मदत होईल.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com