एका प्राध्यापकाने MBA च्या विद्यार्थ्यांना मार्केटींग शिकवले असे भन्नाट !

कोणताही विषय हा जेव्हा सोपा करून सांगितला जातो तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात रहातो.
आता हेच प्राध्यापक पहा ना.. ज्यांनी आपल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना मार्केटींगचा विषय किती रंजकपणे समजावून सांगितला..

1. तुम्ही एका पार्टीत जाता आणि पार्टीतल्या एका सुंदर मुलीच्या पहाताक्षणी प्रेमात पडता, आणि लगेच तिला लग्नाची मागणी घालून मोकळे होता .... हे झालं डायरेक्ट मार्केटींग ! 

2. एका पार्टीत तुम्ही मित्रांच्या घोळक्यात असताना एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते. तुमचा मित्र जाऊन त्या मुलीला भेटतो आणि तुमच्याविषयी सांगतो, हा फार श्रीमंत आहे याच्याशी लग्न कर ... ही झाली जाहिरात !

3. एका पार्टीत तुमच्याकडे एक सुंदर मुलगी येते आणि तुम्हाला म्हणते, तू फार श्रीमंत दिसतोस, माझ्याशी लग्न करशील का ? ... हे झालं ब्रँड रेकग्निशन !

4. एका पार्टीत तुम्ही एका सुंदर मुलीला स्वतःहून मागणी घालता आणि ती रागाने तुमच्या कानशिलात भडकावते... हा झाला कस्टमर फीडबॅक !
5. एका पार्टीत तुम्ही एका सुंदर मुलीला स्वतःहून मागणी घालता आणि ती तिच्या नवऱ्याची आणि तुमची भेट  करून देते... ही झाली डिमाण्ड सप्लाय गॅप ! 
6. एका पार्टीत तुम्ही एका सुंदर मुलीला पहाता आणि तिच्याशी बोलायला जाणार इतक्यात तुमची बायको मध्ये येते ... ही झाली नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यातील मर्यादा !

धन्यवाद
टीम नेटभेट
'मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !'