वाचनवेड्या माणसांचं जग

वाचनवेडा माणूस आणि अजिबात वाचन न करणारा माणूस या दोघांच्याही आयुष्याची तुलना करूया.
जो माणूस अजिबात वाचन करत नाही, तो माणूस त्याच्या वास्तवाशी, त्याच्या तात्कालीक अस्तित्वाशी कायम जखडलेला असतो. त्याचं जीवन म्हणजे केवळ एक दैनंदिन रटाळ नित्यक्रम असतो. त्याच्याकडे थोडेसेच आणि नेहमीचेच मित्रमंडळी असतात, तो त्यांच्यातच रमतो, त्यांच्यातच उठतोबसतो, तेवढ्याच जगाशी त्याचं संभाषण होतं. त्याच्याजवळ जुजबीच माहिती असते, अगदी शेजारपाजारच्या घरांमध्ये काय होतंय इतकंच त्याला माहिती असतं.. आणि या अशा मर्यादीत जगाच्या कैदेतून त्याची कधीच सुटका होत नाही.

पण, त्या क्षणी जेव्हा तो एखादं पुस्तक वाचायला लागतो, तोजणू दुसऱ्या जगात जाऊन पोचतो..आणि जर ते पुस्तक फार फार सुंदर असेल तर त्याचा त्या पुस्तकाच्या लेखकाशी अप्रत्यक्षरित्या संवाद सुरू होतो.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

हा लेखक .. म्हणजेच एका अर्थाने संभाषणकर्ता .. या अशा माणसाला जगण्याची वाट दाखवू लागतो आणि एका नव्या जगात, वेगळ्या देशात, किंवा अगदी वेगळ्या वयातही घेऊन जातो. कदाचित तो त्याच्या मनावरील ओझंही उतरवण्याचा प्रयत्न करतो.. किंवा, तो जीवनाबद्दल असं काही ज्ञान या माणसाला देऊन जातो ज्याचा त्याने आजवर कधीच विचारही केलेला नसतो. कदाचित तो त्याला जीवनाकडे बघण्याचा एक निराळा दृष्टीकोनही बहाल करून जातो.

एखादा प्राचीन लेखक स्वतःला एखाद्या पुस्तकातल्या फार पूर्वीच्या एखाद्या आत्म्याशी किंवा होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्तीमत्त्वाशी जोडतो आणि ते पुस्तक वाचता वाचता त्यात हरवून जातो, तो कल्पना करू लागतो की तो प्राचीन लेखक तेव्हा त्याकाळी स्वतः तिथे असता तर तो कसा दिसला असता, किंवा तो कशाप्रकारचा माणूस असता तेव्हा .. वगैरे वगैरे..

आणि अशाप्रकारे दिवसभराच्या 24 तासातील केवळ 2 तास पुस्तकाच्या काल्पनिक वा वास्तवाशी निगडीत असलेल्या एका वेगळ्या जगात जाणं, स्वतःच्या भवतालशी संपर्क न उरणं आणि एका निराळ्याच दुनियेत रममाण होणाऱ्या लोकांचा हेवा वाटणं अशा लोकांसाठी स्वाभाविकच आहे नै जे स्वतःच्या वास्तवाचेच कैदी झालेले असतील.. !

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com