AI ने तयार केलेली इंस्टाग्राम influencer


मंडळी, या चित्रातील ही मुलगी एक इंस्टाग्राम मॉडेल आहे जी वर्षाकाठी १० मिलियन डॉलर्स कमवते.
पण ती इन्स्टाग्राम वरील इतर सर्व IG मॉडेल्ससारखी नाही.
लिल मिगुएला या नावाची ही इन्स्टाग्राम influencer दररोज तिच्या २ दशलक्ष फॉलोअर्सना स्वतःचे फोटो पोस्ट करते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीये.
मिगुएला १००% AI ने तयार केलेली आभासी व्यक्ति आहे. तिला अमेरिकन AI कंपनी ब्रुडने (Brud) तयार केले आहे आणि तिच्या माध्यमातून जाहिराती करण्यासाठी अनेक ब्रँड्स ने तिच्यासोबत भागीदारी केलेली आहे. यासाठी प्रति पोस्ट ८,००० डॉलर्स पर्यंत चार्ज केले जातात.
वास्तविकतेचा आणि AI मधील फरक हळूहळू कमी होत असल्याने, हेच भविष्यातील प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंगचे स्वरूप असू शकते हे आपल्या लक्षात आले असेल.


============================
➡️ AI जगतातील अशा अनेक घडामोडी सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/LaEMHKblZFy1Mwn4g5IIvR
============================


AI ने तयार केलेल्या व्यक्ती सोशल मीडिया मध्ये पुढे करोडो डॉलरचा ग्राहक ब्रँड तयार होऊ शकतात. आपला आवडता हिरो किंवा हिरोईन प्रत्यक्षात AI ने तयार केलेली व्यक्ती असू शकते. उद्योजक त्यांच्या उत्पादनासाठी असे brand ambassador स्वतःच तयार करू शकतील.
तुम्हाला काय वाटतं.... कसे असतील हे बदल ? आणि कोणत्या नव्या संधी यातून उपलब्ध होतील?
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet com