व्यक्ती खरं बोलते आहे कि खोट हे शोधणार AI TOOL



झूठ बोले AI काटे.....
माणसांनी मशिन्स बनवल्या त्या आपले प्रश्न सोडविण्यासाठी. पण आपले प्रश्न काही संपत नाही आणि माणूस देखील मशिन्स बनवणे सोडत नाही. असाच एक आतापर्यंत न सोडवता आलेला प्रश्न सोडविण्यासाठी AI मदत करत आहे. तो प्रश्न आहे "समोरील व्यक्ती खरं बोलतोय की खोटं हे शोधण्याचा !" आणि ते देखील समोरच...लगेचच...व्यक्ती बोलत असतानाच !! आहे की नाही भारी ! चला तर मग बघूया कसं ते.
आज जे टूल आपण पाहणार आहोत ते टूल ऑनलाईन वापरता येतं आणि सध्या झूम मिटिंग , गुगल मीट आणि काही ऑनलाईन विडिओ कॉलिंग अँप्स मध्ये समोरील व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं याचा अंदाज बांधते. आणि लगेचच स्क्रीनवर दाखवते.
LiarLiar नावाचं हे टूल (Link ➡️ https://salil.pro/liarliar) कसं काम करतं ते आधी बघूया.
हे टूल लाईव्ह मिटिंग मध्ये समोरील व्यक्तीच्या अतिसूक्ष्म हालचाली, देहबोली, आवाजातील उतार चढाव, हृदयाच्या ठोक्यांमधील बदलता वेग यांचा अभ्यास करून अंदाज बांधते.
Remote Photoplethysmography ही टेक्नॉलॉजी वापरून हृदयाच्या ठोक्यांमधील बदलता वेग (heart rate fluctuations) आणि त्यामुळे होणारे चेहर्यावरील अतिसूक्ष्म हावभाव टिपते. आणि त्यावेळी असलेली माणसाची नेमकी मानसिक स्थिती कशी आहे याचा अंदाज बांधते.
त्याचसोबत Body Language (देहबोली) चा अभ्यास करून अप्रामाणिक व्यक्तीची खोटं बोलताना कशी देहबोली असेल यासोबत संबंध जोडला जातो आणि किती टक्के जुळत आहे हे स्क्रीनवर दाखविले जाते.
============================
➡️ मराठी माणसाला AI युगासाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न !
AI जगतातील अशा अनेक घडामोडी आणि युक्त्या सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. 📚
https://linke.to/NetbhetAI
============================
हे टूल एकदम वाचून माहिती देते असे नाही मात्र ते अप्रामाणिकपणा किती % आहे हे सांगते. आणि स्वयंशिक्षणात माहीर असणारा AI जेवढ्या केसेस बघेल तेवढा अधिक शिकत जाईल आणि अचूक होत जाईल.
ऑफिस मधील कामचुकार मंडळींसोबत मिटिंग करताना, अनोळखी ग्राहक-कंपनी सोबत व्यवहार करताना, नोकरीसाठी मुलाखती घेताना , ऑनलाईन मिटिंग मधून लग्न जुळवताना अशा अनेक ठिकाणी या जबरदस्त टूलचा उपयोग होऊ शकेल. सध्या विंडोज आणि मॅक संगणकावर हे टूल इंस्टाल करता येईल. केवळ ३२०० रुपयांमध्ये life time ऍक्सेस उपलब्ध आहे. त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता.

Link ➡️ https://salil.pro/liarliar


धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !