सावध तो सुखी

डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षरतेपासून सावधानतेपर्यंत!

नमस्कार,

अलिकडच्या काळात आपले आर्थिक व्यवहार डिजीटल स्वरूपात झाले त्याचबरोबरीने नव्या माध्यमांद्वारे फसवणुकीच्याही अनेक घटना दिवसागणिक घडू लागल्या. कालौघात हे प्रमाण वाढतच चालले आहे.

डिजिटल माध्यमातून सुरळीत आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याविषयाची पूर्ण व योग्य माहिती असणे अत्यावश्यक झालेले आहे. तसेच नेमकी काय काय सावधानता बाळगावी हे देखील समजून घेणे, शिकणे फार गरजेचे झाले आहे. त्यामुळेच नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सतर्फे घेऊन येत आहोत, सावध तो सुखी ही मोफत कार्यशाळा.

या कार्यक्रमात काय शिकता येईल
✅ फसवे मेसेजेस कसे ओळखावे?
✅ बनावट फोन, ईमेल यांपासून सुरक्षित कसे राहावे?
✅ एटीएम वा डेबिट कार्ड वा क्रेडीट कार्डद्वारे होणारी फसवणूक,
✅ ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना होणाऱ्या गफलती

प्रशिक्षक -
गेली 33 वर्ष बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि 19 वर्ष सीडीएसएलमध्ये कार्यरत असणारे मा.श्री.चंद्रशेखर ठाकूर यांनी डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षरता, प्रसार आणि प्रबोधन करण्यासाठी सावध ते सुखी या कार्यक्रमाची निर्मिती केली असून आजवर त्यांनी याविषयी 1700 हून अधिक कार्यक्रम देशभरात केलेले आहेत.

📅 दिनांक - 9 जून 2022
⏱️ वेळ - 7.30 PM

👉 विनामूल्य रजिस्ट्रेशन लिंक - https://my.netbhet.com/savadh-to-sukhi

आर्थिक व्यवहारांबाबत अधिक दक्ष रहाण्यासाठी व आपली फसवणूक टाळण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणाऱा हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका...!

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !