मोठी आव्हाने पेलण्यासाठी स्वतःला बदला .. सांगत, प्रेझेन्स हे पुस्तक ! (#Saturday_Bookclub)

जीवनात आपल्यासमोर कोणत्याही क्षणी मोठी आव्हानं येऊ शकतात, परंतु, अशी अनेक आव्हानं असतात, ज्यांना आपल्याला कधी ना कधी सामोरे जावंच लागणार असतं, हे आपल्याला आधीपासूनच ठाऊक असतं. अशावेळी आपण स्वतःला बदलून ही आव्हानं कशी पेलू शकतो याविषयी आपल्याला Amy Cuddy लिखीत, प्रेझेन्स हे पुस्तक सांगतं.

या पुस्तकात लेखिकेने अतिशय सविस्तर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आपल्या मेंदूत आणि शरीरात जे नातं असतं ते ओळखून जर आपण वागलो तर आपल्याला कधीच पॉवरलेस वाटणार नाही असं लेखिका सांगते. याबाबत तिने पुस्तकात अनेक उदाहरणं दिलेली आहेत.

देहबोलीला आपण फारसं महत्त्व देत नाही त्यामुळे जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग ओढवतो तेव्हा आपण तो प्रसंग पेलायला कमी पडतो. यासाठी लेखिकेने एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. समजा, तुम्ही एखाद्या बाळाला झोपवत आहात आणि त्यावेळी जर तुम्ही त्या बाळाकडे रागाने पहात आहात, तुमचं शरीर अत्यंत कडक झालेलं आहे, तुमच्या देहबोलीतून राग प्रकट होत आहे, आणि तुम्ही तोंडाने अंगाई जरी म्हणत असाल तरीही त्या बाळाला झोप येणार नाही. याचं कारण, तुमची देहबोली योग्य नाही.. त्यामुळे बाळाला तुमच्याविषयी मनातून विश्वास वाटणार नाही, व ते घाबरून मोठ्याने रडत राहील. याचाच अर्थ, देहबोली आणि तुमचं मन यात जर एकसमानता नसेल तर तुम्ही जीवनात कधीही कोणत्याच कार्यात यशस्वी होणार नाही असं लेखिका सांगते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

2000 साली हार्वर्ड विद्यापीठात याबाबत एक संशोधन करण्यात आले होते. यामध्ये दोन ग्रुप तयार केले. एका ग्रुपमध्ये बोलणारे लोक आणि दुसऱ्यात असे लोक ज्यांना बोलता येत नाहीये, ऐकता येत नाही असे लोक होते. दोघांनाही काही व्हिडीओज दाखवण्यात आले. त्या व्हिडीओतील माणसं कधी खरं बोलायची कधी खोटं आणि पहाणाऱ्या गटातील लोकांनी हेच ओळखायचं होतं की व्हिडीओत कधी खरं बोललं जातंय आणि कधी खोटं.. यावेळी असं लक्षात आलं की कर्णबधिर लोकांनी खूप वेळा हे अचूकपणे ओळखलं. याचं कारण हे, की कर्णबधिर लोकांना व्हिडीओतील लोकांचे शब्द ऐकू येत नसून, त्यांच्या देहबोलीकडेच जास्त बारकाईने लक्ष दिल्याने त्यांना लगेच ओळखू आलं की कोण खोटं बोलतंय.

देहबोलीवरून हे ओळखता येतं की तुमच्या खऱ्या भावना काय आहेत. म्हणूनच जेव्हाही तुम्ही बोलता तेव्हा तुमची देहबोलीही योग्य असणं फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा.

स्वसंवाद किंवा आत्मसंवाद साधल्याने तुमची देहबोली अधिक खुलून येते. तसंच, तुमची जीवनमूल्य, तुमचे विचार याची एक यादी तुमच्याजवळ तयार केलेली असावी. यामुळे तुम्हाला तुमचं उज्ज्वल भविष्य रेखाटणं अधिक सोपं जाईल असं लेखिका सांगते.

इम्पोस्टर सिंड्रोम -

जेव्हा तुम्हाला स्वतःलाच असं वाटायला लागतं की तुमच्यातच काहीतरी कमी आहे आणि त्यामुळे तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाहीत, तर खरंच तुम्ही प्रगती करू शकणार नाही, याला मानसशास्त्रतज्ञांनी इम्पोस्टर सिंड्रोम असे नाव दिलेले आहे. यामध्ये व्यक्तिला स्वतःविषयी, स्वतःच्या कौशल्यांविषयीच शंका असतात. यामुळे ती व्यक्ती नेहमी सेल्फ डाऊट्स घेत असते.. त्या व्यक्तीने कितीही प्रगती केली असू देत ती कायम सेल्फ डाऊट घेऊ शकते. मानसशास्त्रतज्ञांच्या अनुसारे, हा सिंड्रोम अतिशय कॉमन आहे. यामुळे जर तुम्हालाही अशा भावना येत असतील तर त्यामुळे विचलीत होऊ नका, या भावनांमुळेच तुम्ही अधिक प्रगती करत रहाता हे लक्षात ठेवा.

एकंदरीतच मानवी मन, मेंदू आणि शरीर या तिन्हीतील परस्पर संबंध याविषयी हे पुस्तक आपल्याला एक नवा दृष्टीकोन देऊन जाते.

पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/presence

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com