सुस्पष्ट ध्येय साध्य करता येतातच ! (#Saturday_Bookclub)

Goals by Brain Tracy .. एक असं पुस्तक, जे तुम्हाला सांगतं की जीवनात तुमची ध्येय किती महत्त्वाची आहेत ते .. आणि जर तुम्ही तुमची ध्येय सुस्पष्ट ठेवलीत, त्या ध्येयांचा सतत माग घेत राहिलात तर एक ना एक दिवस ती ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यात तुम्हाला यश आलेलं असतं. अर्थात, ध्येयांचा मागोवा घेत जेव्हा तुम्ही जीवनाची वाट चालता तेव्हा जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुमची ध्येय प्रत्यक्षात येतातच.. असा ठाम विश्वास ब्रायन ट्रेसी लिखीत गोल्स या पुस्तकातून आपल्याला मिळतो.

जबाबदारी स्वीकारल्यानंतरच तुमच्या मनातील सगळ्या नकारात्मक भावनांचा निचरा होऊन जातो असे या पुस्तकाचे लेखक म्हणतात.

अनेकदा आपण जेव्हा भोवती पहातो, तेव्हा आपल्याला दिसतं की अनेक जण आज आपल्यापेक्षा जीवनात खूप पुढे निघून गेलेले आहेत, असे दिसल्यावर आपलं मनं खंतावतं.. आपल्याला हा एकच प्रश्न छळत रहातो, की जीवनाचं हे असं का आहे, की काही लोक आपलं ठरवलेलं ध्येय साध्य करून जीवनात आनंदाने झपाट्याने प्रगती करताना दिसतात, तर काही लोक कितीही संघर्ष केला तरीही आपलं ध्येय साध्य करू शकत नाहीत.. ते फक्त स्वप्नच पहात रहातात. याच प्रश्नाचं उत्तर गोल्स या पुस्तकात लेखकाने ध्येय गाठण्याविषयीचे विविध सिद्धांत लिहून मांडले आहे. या सिद्धांतांचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात ठरवलेली उद्दीष्ट, ध्येय नक्कीच साध्य करू शकता असे लेखक म्हणतो.

1. अपल्या शक्यतांचा विचार करा -

यशस्वीतेचा एक मंत्र आहे, तुम्ही कुठून आलात ते महत्त्वाचं नाहीये, तर तुम्ही कुठे चालला आहात ते महत्त्वाचं आहे असं यशस्वीता तुम्हाला सांगते. म्हणूनच जीवनात ध्येय ठरवून त्यादृष्टीने पाऊले टाकणं महत्त्वाचं असतं. तुम्ही जे विचार करता तेच तुमचं सत्य कालांतराने बनून जातं म्हणूनच विचारांवर कायम लक्ष ठेवा. हार्वर्ड विद्यापीठात याबाबत एक संशोधन करण्यात आले. त्यात एमबीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं जीवनातील ध्येय काय आहे हे विचारण्यात आलं, तेव्हा त्या बॅचमधील फक्त 3 टक्के विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष्य, त्यांचं ध्येय हे लिखीत स्वरूपात तयार होतं. बाकी 13 टक्के विद्यार्थ्यांजवळ त्यांचं लक्ष्य तर होतं पण ते लिखीत स्वरूपात नव्हतं आणि उरलेल्या 84 टक्के विद्यार्थ्यांजवळ कोणतंही उद्दीष्ट ठरलेलं नव्हतं. दहा वर्षांनंतर जेव्हा अभ्यासक पुन्हा त्यांना भेटले तेव्हा असं लक्षात आलं की, ते 13 टक्के विद्यार्थी हे उरलेल्या 84 टक्के विद्यार्थ्यांपेक्षा दुपटीने अधिक पगार कमावत होते पण सर्वात इंटरेस्टींग गोष्ट ही होती की जे 3 टक्के विद्यार्थी ज्यांच्याजवळ त्यांची लेखी उद्दीष्ट होती ते उरलेल्या 97 टक्के विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल दसपट अधिक कमावत होते.

याचाच अर्थ, जीवनात लिखीत आणि सुस्पष्ट ध्येय किती महत्त्वाची आहेत हे या संशोधनांती सिद्ध झाले.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

2. आपल्या आयुष्याची दोर आपल्याच हातात असली पाहिजे.-

नकारात्मक भावना तुमच्या यशात आणि आनंदात मीठाचा खडा घालत असतात, त्यामुळे या भावना मनातून काढून टाका. जगाच्या सुरुवातीपासून या नकारात्मक भावनांनी मानवजातीला जितका त्रास दिलाय त्या तुलनेत अन्य कोणत्याही संकटांनी, मानवजातीला कमीच छळलं असेल असं लेखक म्हणतात. म्हणूनच जर तुम्हाला खरंच आनंदी आणि यशस्वी व्हायचं असेल तर आधी या नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा.

याखेरीज अन्य 20 प्रकरणांमध्ये एक एक सिद्धांत मांडून लेखकाने ध्येयांच्या सुस्पष्टतेने आपण जीवनात यश आणि आनंद कशाप्रकारे मिळवू शकतो हे सांगितलेले आहे.

फ्री ऑडीओ बुक लिंक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/Goals

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com