चरित्र वाचायची असतील तर या वेबसाईटला जरूर भेट द्या ! (#Web_Wednesday)

आपल्यापैकी बऱ्याच जणांना मोठ्या, नामांकीत व्यक्तींची चरित्र वाचायला खूप आवडतं. ती व्यक्ती नेमकी कशी घडली, त्यांच्या बालपणाविषयीची माहिती, त्यांच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग ज्यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला, त्या व्यक्तींचे आदर्श कोण, त्यांचे विचार कसे असं सगळं सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी आपल्यासारखे अनेक लोक आजवर चरित्रात्मक पुस्तकांचाच आधार घेत आले आहेत. मात्र, इंटरनेटच्या जादूई दुनियेतली एक वेबसाईट अशी आहे, ज्यावर तुम्हाला नामांकीत व्यक्तींची चरित्र वाचायला मिळतील. त्याचबरोबर, चरित्र वाचण्याऐवजी, शॉर्ट व्हिडीओज पाहूनही त्या नामांकीत व्यक्तीचं संक्षिप्त चरित्र जाणून घेता येईल.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

या वेबसाईटचं नाव आहे बायोग्राफी डॉट कॉम.

( https://www.biography.com/ )

या वेबसाईटवर तुम्हाला जगभरातील विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींची व जगप्रसिद्ध व्यक्तींची चरित्र वाचायला मिळतील.

या वेबसाईटवर पीपल, नोस्टॅल्जिया, सेलिब्रिटी, हिस्टरी अँड कल्चर, क्राईम अँड स्कँडल आणि व्हिडीओ अशा कॅटेगरीज करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक कॅटेगरीअंतर्गत नामांकीत व्यक्तींची माहिती अत्यंत रंजक स्वरूपात मांडण्यात आलेली आहे. सर्वात उत्तम म्हणजे, जर तुम्हाला मोठे मोठे लेख वाचत बसण्यात रस वाटत नसेल तर तुम्ही एकाच व्यक्तीची संक्षिप्त चरित्र निरनिराळ्या व्हिडीओ पार्टमध्ये पाहू शकता हे या वेबसाईटचे विशेष.

टेलर स्विफ्ट, मायकल जॅक्सन, मदर टेरेसा, सेरेना विलीअम्स, लेडी गागा यांपासून ते अलेक्झांडर ग्राहम बेल, थॉमस एडीसन अशा शास्त्रज्ञांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दलही या वेबसाईटवर माहिती सापडते. त्याचबरोबर ही चरित्र मांडणी खरोखरीच इतकी सोपी आणि रंजक पद्धतीने केलेली आहे की आपल्याला वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. त्याचबरोबर त्या सेलिब्रिटीच्या जीवनातील काही आठवणींचे प्रत्यक्ष फोटोजही पहायला काही काही लेखांमध्ये मिळतात, ते पहाणंही अत्यंत रंजक आहे.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com