इन्स्टाग्राममधले हे नवे बदल तुम्हाला ठाऊक आहेत का ? (#Techie_Tuesday)

दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत चाललेल्या इन्स्टाग्रामवर आता काही महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, इन्स्टाग्राम लाईव्हवर आता यापुढे तुम्हाला मॉडरेटर add करता येऊ शकेल त्याचबरोबर, यापुढे इन्स्टाग्रामच्या स्टोरीजलाही लाईक बटण देण्यात येणार आहे.

याबाबत इन्स्टाग्रामकडून सध्या हे फीचर कशाप्रकारे योग्यरितीने काम करील याबाबत ट्रायल्स सुरू आहेत. इन्स्टाग्रामवर लाईव्ह करताना बरेचदा लोकांच्या प्रतिक्रिया, प्रश्न, कमेंट्स वगैरे येत असतात, परंतु जो लाईव्ह व्हिडीओ करत असतो, त्याला स्वतःचं लाईव्ह आणि लोकांच्या प्रतिक्रिया हे एकाच वेळी हाताळणं कठीण होऊन बसतं.. हीच अडचण लक्षात घेऊन इन्स्टाग्रामने हा बदल करण्याचा विचार केला आहे.

इन्स्टावर लाईव्ह करणारा जो व्यक्ती असेल तो आपल्या लाईव्हमध्ये आपल्या इच्छेनुसार एक व्यक्ती मॉडरेटर म्हणून जोडून घेऊन शकतो. हा मॉडरेटर फक्त एकच जण कोणीही असू शकतो. त्याच्या हातातील महत्त्वाच्या पॉवर्स म्हणजे, हा मॉडरेटर कमेंट्स मॅनेज करू शकतो, तसंच अगदीच वाटल्यास तो कमेंट्स ऑफपण करू शकतो, लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकतो, प्रश्नोत्तर घेऊ शकतो.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

इन्स्टावर आणखी एक नव्याने येणारं फीचर म्हणजे इन्स्टा स्टोरीजमध्ये आता लाईकचं बटण येणार आहे. सध्या इन्स्टा यूझर्स हे कोणाच्याही स्टोरीजवर केवळ रिएक्ट होऊ शकतात, आणि ही प्रतिक्रीया त्या क्रिएटरला इनबॉक्समध्ये डायरेक्ट मेसेज स्वरूपात दिसते. मात्र, यापुढे स्टोरीला लाईक बटण असेल. हे फीचर तपासण्याचे काम यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे. हे फीचर लोकांसाठी केव्हापासून उपलब्ध होईल याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती नाही.

इन्स्टाबरोबरच नव्याने येऊ घातलेल्या फेसबुकच्या नव्या अवतारात, अर्थात, मेटाव्हर्समध्ये तर भरपूर मजेदार, नव्या, रंजक फीचर्सची रेलचेल असणार आहे. ऑक्टोबरमध्ये फेसबुकने कोलॅब्स नावाचं जे फीचर सुरू केलं त्याद्वारे तर, फेसबुक दोन यूझर्सना सेम कंटेंट पब्लिश करण्याचीही संमती देत आहे. मुख्य म्हणजे, यूझर चक्क फीड पोस्ट्स आणि रील्सला कोऑथर नेमू शकतात आणि या दोन्ही ऑथरची नावं, पोस्ट्सच्या वर झळकतील अशी सोय फेसबुक करत आहे.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com