व्हॉट्सएपचे हे फीचर्स तुम्हाला माहिती आहेत का ? 

(#Techie_Tuesday)

आपल्या जीवनाचा हल्ली अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअपचा वापर आपण इतका सहज करायला लागलो आहोत की त्याशिवाय आपलं पानही हलत नाही. उठल्याबरोबर आपण गुडमॉर्निंगचा मेसेज पाठवतो, सणावाराला, कोणत्याही विशेष दिनाला, वाढदिवसाला भरपूर इमेजेस, फोटोज असलेले मेसेजेस आपण एकमेकांना शेअर करतो. इतकंच काय, तर कोणी डीलीट केलेला मेसेज असेल तर तो सुद्धा आपण त्याला लगेच विचारतो, काय रे काय डिलीट केलंस सांग ... इतके आपण या व्हॉट्सअप मेसेजिंगला सरावलो आहोत. म्हणूनच व्हॉट्सअपचे काही भन्नाट फीचर्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. ज्यांना हे फीचर्स माहिती नसतील त्यांना निश्चितच या इंटरेस्टींग फीचर्सचा उपयोग होईल.

1. Disappearing Messages -

व्हॉट्सअप ग्रुप्ससाठी हे फीचर विशेषतः फार उपयोगी आहे. ग्रुपच्या सेटींग्समध्ये गेल्यावर Turn On Disappearing Messages पर्याय दिसतो, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिसअपीअरिंग मेसेजेसबद्दलची सविस्तर माहिती देणारी एक विंडो ओपन होते. त्यावर दिलेली माहिती नीट वाचून मग तुम्ही एखाद्या ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकता. डिसअपिअरींग मेसेजेस ऑन केल्यानंतर ग्रुपवर सात दिवसापूर्वीची माहिती आपोआप डिलीट होण्यास सुरुवात होते. यामुळे आपसुकच तुमच्या फोनच्या मेमरीवर आलेला ताण कमी होतो. फोटोज, इमेजेस, जीआयएफ सगळं काही सात दिवसांपर्यंतच रहातं, त्यापूर्वीचे मेसेजेस डिलीट होत जातात.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

2. डिलीट केलेले मेसेजेस वाचण्याची ट्रिक -

बरेचदा, आपल्याला आपल्या मित्रमंडळींनी एखादा मेसेज जो डिलीट केलेला असतो तो नेमका काय होता याची उत्सुकता असते. हे डिलीट केलेले मेसेजेस वाचण्यासाठी एक भन्नाट app प्ले स्टोअर मध्ये आहे. नोटीसेव्ह (Notisave) नावाचं हे app ज्याचा आयकॉन नोटीफीकेशन बेलसारखा आहे ते डाऊनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या नोटीफिकेशन्सचे इत्थंभूत अपडेट मिळतील, इतकंच काय, डिलीट केलेले मेसेजेससुद्धा त्यामध्ये वाचायला मिळतील.

3. Media Visibility -

आपल्याला खूप खूप त्रास होतो जेव्हा एखाद्या ग्रुपवर कोणी अचानक खूप सारे फोटोज, इमेजेस धडाधड पाठवतं. आपल्याला त्यामध्ये एकतर काहीच रस नसतो आणि त्याशिवाय, हे फोटोज थेट गॅलरीत सेव्ह होतात आणि फोनची मेमरी सतत फुल करतात. त्यामुळे, ते नको असलेले फोटो किंवा व्हिडीओ डिलीट करत बसणं हा एक अत्यंत वेळखाऊ टास्कच रोज आपल्यामागे लागलेला असतो. म्हणूनच, व्हॉट्सअप ग्रुपच्या सेटींग्जमध्ये तुम्हाला Media Visibility चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला Show newly downloaded media from this chat in your phone's gallery ? असा प्रश्नाखाली तीन पर्याय दिसतील. Default (Yes), Yes आणि No या तीन पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून तुम्ही त्या त्या ग्रुपमध्ये शेअर होणाऱ्या मीडियाला कंट्रोल करू शकता. म्हणजेच, जर तुम्ही Media Visibility No असा पर्याय निवडलात तर ग्रुपवर आलेले कोणतेही फोटोज वा व्हिडीओज थेट डाऊनलोड होणार नाहीत.. तुम्हाला त्यापैकी जे फोटो वा व्हिडीओ पहावेसे वाटतील त्यावर क्लिक करून तुम्ही ते मॅन्युअली डाऊनलोड करू शकता. यामुळे भारंभार फोटोजने तुमच्या फोनची गॅलरी फुल होण्यावर जरा नियंत्रण मिळवणे तुम्हाला शक्य होईल.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy