There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकजणच स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेत आहे. त्यामुळेच, बरेचदा अनेकांची फसगतही होते, कारण प्रत्यक्षातली व्यक्ती वेगळी असते मात्र त्याच व्यक्तीची सोशल मीडिया इमेज कैक पटींनी वास्तवापेक्षा निराळीच असते. त्यामुळे सोशल मीडियावरील एखाद्याची इमेज बघून कधीही भुलून जाऊ नका. त्यापेक्षा नीट विचार करा आणि त्या प्रतिमेमागील त्या व्यक्तीचे वास्तव नेमके काय आहे हे ओळखायला शिका.
राहुल आणि सुशांत दोघेही चांगले मित्र आहेत. दोघंही सोबतच पदवीधर झाले, आणि दोघांनाही एकाच कंपनीत सारख्या पगाराची नोकरी मिळाली. राहुलला मिळणारे हजार डॉलर्स त्याने नीट विचार करून आणि अभ्यास करून गुंतवले ज्यावर त्याला 350 डॉलर्स व्याज मिळू लागले. म्हणजे आता राहुलकडे एकूण 1350 डॉलर्स झाले.
सुशांतने मात्र पहिल्याच पगारातून मस्त शॉपिंग केली आणि सुट्टी घेऊन फिरायला जाऊन आला. त्या पिकनीकचे आपले स्मार्ट फोटोजही सोशल मीडियावर तो अपलोड करायला विसरला नाही. सुशांतचे सोशल मीडिया फॉलोअर्स त्याचा नवा अंदाज पाहून भारावून गेले. त्यांनी त्याला भरपूर लाईक्स दिले, बदाम दिले, आणि अनेकांना मनोमनी त्याच्याबद्दल मत्सरसुद्धा वाटला.
पण प्रत्यक्षात सुशांत जरी स्वतःला विजेता दाखवत असला तरीही तो खरा विजेता नव्हता. कारण त्याने त्याच्याजवळच्या पहिल्याच पगारातून भविष्याचा विचार न करता पैसे उडवले होते.
राहुलने मात्र सुरुवातीपासूनच आपल्या पैशांना आणि पर्यायाने जीवनाला गांभीर्याने घेत गुंतवणुकीचा एक योग्य पर्याय विचारपूर्वक निवडला होता.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या सोशल मीडियावरच्या प्रतिमेला भुलू नका. सोशल मीडियावर तुम्हाला दिसणारे विजेते हे प्रत्यक्षात कधीकधी आपल्या चुकीच्या सवयींमुळे आणि निर्णयांमुळे केव्हाच अपयशी झालेले असू शकतात.