चीनमधील तत्वज्ञ लाओ त्सु यांनी जीवनाप्रती सांगितलेल्या काही मौल्यवान गोष्टी

चीनमध्ये फार पूर्वी लाओ त्सु नावाचे एक संत होऊन गेले. ते ताओ धर्माचे संस्थापक होते. त्यांनी जीवनाबद्दल जे विचार मांडले ते आजही फार मौल्यवान आहेत. जाणून घेऊया त्यांनी दिलेल्या विचारांपैकी काही मौल्यवान विचार -

  1. जर तुम्ही निराश असाल, तर तुम्ही भूतकाळात जगत आहात.. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर तुम्ही भविष्यकाळात जगत आहात.. मात्र जर तुम्ही शांतता अनुभवत असाल तरच तुम्ही वर्तमानात जगत आहात. 
  2.  साधेपणा, संयम आणि करूणा हे तीन गुण अनमोल आहेत, ते जपून ठेवा.
  3.  दुसऱ्याला ओळखून असणे हे चातुर्य आहे. स्वतःला ओळखणे हे खरे शहाणपण आहे. इतरांवर प्रभुत्व मिळवणे ही ताकद आहेच मात्र स्वतःवर प्रभुत्त्व मिळवणे ही खरी शक्ती आहे...म्हणून स्वतःला ओळखा.
  4.  पाणी गढूळ झालं असेल तर थोडावेळ ते तसंच राहिलं की स्वच्छ होतं. त्याचप्रमाणे मनाला वेळ दिला की ते काही वेळाने शांत होतं. 
  5.  लोक काय म्हणतील याचा विचार करत बसा आणि जन्मभरासाठी लोकांचे कैदी व्हा..
  6.  ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, त्याला इतरांना पटवण्याची गरज नसते. 
  7.  वेळ ही गोष्ट कृत्रिम आहे. जेव्हा एखादा म्हणतो मला वेळ नाही तेव्हा त्याचा अर्थ बरेचदा मला ते करायचं नाहीये असा असतो. 
  8.  ज्ञान मिळवायचं असेल तर एकेक गोष्ट मेंदूत साठवत चला, शहाणपण मिळवायचं असेल तर डोक्यातून एकेक गोष्ट काढून टाकत चला. 
  9.  ज्यांना माहिती असतं ते बोलत नाहीत, ज्यांना माहिती नसतं तेच बडबड करत असतात.