मानवी वर्तनाविषयी काही थक्क करणारी सत्य

ज्याप्रकारे शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राविषयी अभ्यास केला आहे त्याचप्रमाणे मानवी वर्तनाविषयीही अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. एखाद्या परिस्थितीत माणूस अमुक एका विशिष्ट पद्धतीनेच का वागतो याबाबतचे संशोधन जेव्हा शास्त्रज्ञांनी केले तेव्हा अनेक सत्य समोर आली. त्यापैकी काही खालीलप्रमाणे - 

1. आपण जसे कपडे परिधान करतो, तसेच आपले वर्तन असते. जेव्हा आपण फ्रेश रंगाचे कपडे अंगावर परिधान करतो तेव्हा आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो. 

2. जी माणसं खूप चांगली वागत असतात तीच पूर्वी खूप वेळा अनेकांकडून दुखावली गेलेली असतात. म्हणून बरेचदा, अशी गोड माणसंच मनातून खूप उदास असतात. 

3. शॉपिंगमुळे तुमचा सेल्फ एस्टीम वाढतो तसंच तुमचं मनही अधिक खुलत जातं. तुम्ही अधिक पर्यायांचा विचार करायला आणि इतरांचा दृष्टीकोन स्वीकारायला शिकता. 

4. ज्या महिला अतिविचार करतात, त्या त्यांच्या आप्तस्वकीयांप्रती तुलनेने अधिक उदार आणि मायाळू होतात. 

5. कोणताही फोनकॉल रिसीव्ह करण्यापूर्वी छान स्मितहास्य केलंत तर पलीकडल्या व्यक्तीला ते लगेच जाणवतं आणि त्या संवादात गोडी निर्माण होते. 

6. जेव्हा कोणीही शरीराने थंडावतं, थकतं, तेव्हा अशी व्यक्ती आपल्या मनाला बरं वाटेल अशा गोष्टी करायला लागते, जसं की एखादी रोमँटीक फिल्म पहाणे, त्यामुळे मनाला उब मिळते.