स्वर्गीय लतादिदींकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लतादिदी मंगेशकर हे जग सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जग हळहळले, पण काही माणसं अशी असतात जी आपल्या कामाने या जगात सुगंध पेरून जातात. लतादिदींनी तर त्याहीपलीकडे जाऊन जगातील माणसांच्या आत्म्याला स्पर्श केला. त्यांच्या स्वरांमधील पावित्र्य, माधुर्य आणि त्यांचा अभिजात असा सूर या जगातील मर्त्य मानवासाठी दैवी साक्षात्कारच जणू ! साक्षात सरस्वती मातेचे स्मरण लतादिदींकडे पाहून होत असे.. पण मित्रांनो, केवळ तेवढ्यावरच लतादिदींना पूर्णत्व मिळत नाही, तर त्यांनी त्यांचे जीवन ज्या आदर्श पद्धतीने जगले त्यामुळे त्यांचा सूर साक्षात उजळून निघाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

म्हणूनच, ज्या आदर्श मूल्यांची शिकवण लतादिदींकडून आपण घेऊ शकतो त्याविषयी जाणून घेऊयात. स्वर्गीय लतादिदींकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी - 

  1.  जीवनात कोणत्याही वयात तुमच्यावर कितीही संकटं आली, तरीही खचून जाऊ नका. 
  2.  आपल्याला जे काम  मिळालंय त्याचा आदर करा, त्यावर निष्ठा ठेवा, आणि कामाच्या दर्जात कधीही तडजोड करू नका. 
  3. कधीही इतरांना कमी लेखू नका, तसंच स्वतःवरही विश्वास ठेवा. 
  4. प्रेम आणि नम्रता हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे गुण आहेत ते कधीही विसरू नका. कितीही मोठे झालात तरीही पाय जमिनीवर ठेवा.
  5. आपल्या कुटुंबाला जपा, कुटुंबियांवर निर्व्याज प्रेम करा,तसंच इतरांना माफ करायला शिका. क्षमाशीलता हा मोठा गुण आहे. 
  6.  जे आपल्या वाट्याला येईल ते ते हसत हसत आपल्या ओंजळीत घेऊन पुढे चालत रहा. देवावर श्रद्धा ठेवा. 
   गानसरस्वती लतादिदी मंगेशकरांना टीम नेटभेटची भावपूर्ण आदरांजली