जगद्विख्यात उद्योजक स्टीव्ह जॉब्स यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी

पर्सनल कॉम्प्युटरच्या काळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध उद्योजक स्टीव्ह जॉब्स यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी ... 

  1. तुम्हाला कशा ना कशावर विश्वास ठेवावाच लागतो. मग ती तुमची हिंमत असेल, तुमचं कर्म असेल, किंवा परमेश्वर, नशीब किंवा याखेरीज काहीही...
  2.  तुम्ही आज ज्या गोष्टी करता त्यांना भविष्यात काही ना काही अर्थ निश्चितच प्राप्त होत असतो. हा अर्थ मात्र तुम्हाला भूतकाळात डोकावून बघितल्यानंतरच लक्षात येतो.
  3.  जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की विश्वास ठेवल्यानेच तुम्ही अनेक संकटांमधून सुखरूप बाहेर पडलात. जीवनाच्या अनोळखी वाटांवरही तुम्ही सुरक्षित होतात.  
  4.  यशाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळणं हे कधीकधी फार चांगलं असतं, माझ्यासाठी तर ते फारच चांगलं झालं कारण, माझ्यातील हरवलेला, अवखळ धडपडा तरूण मला पुन्हा गवसला होता...मी पुन्हा नव्याने सुरुवात करू शकलो ती म्हणूनच !
  5.  कधीकधी जीवनाचे कडू घोट तुमच्यासाठी त्या वेळेची गरज असते, अशा क्षणांनाही तुम्ही पुढे जात राहू शकता तेव्हाच, जेव्हा तुम्ही जे काम करत आहात त्यावर तुमची अढळ निष्ठा आणि अपार प्रेम असेल.
  6.  त्याच कामाला अपरंपार यश मिळू शकतं, ज्यावर तुमची निष्ठा असेल, आणि तुम्हाला जे काम मनापासून करायला आवडतं, त्यातच तुमचं यश दडलेलं असतं. 
  7. यशाचा ध्यास घेऊ नका, त्याऐवजी तुमची आवड शोधा. आपल्या आवडीचं काम मिळेपर्यंत शांत बसू नका. शोध चालू ठेवा. जेव्हा तुमचं आणि तुमच्या आवडीच्या कामाचं घट्ट नातं तयार होईल, तेव्हा यश पायाशी येईलच.. विश्वास ठेवा.
  8.  आजचा दिवस हा माझा शेवटचा दिवस असा विचार करून जगलात तर तुम्हाला कधीही हरण्याची भीती रहाणार नाही, आणि तुमचा आतला आवाज जे सांगतोय तेच तुम्ही करत पुढे जात रहाल, तेव्हाच तुमचं जीवन फुलेल !