सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

Infosys Foundation च्या संस्थापिका असलेल्या सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही? आपल्या सामाजिक कार्याद्वारे आणि लेखनाद्वारे त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांमधून आपल्याला त्यांनी जीवनाचे निरनिराळे रंग तर दाखवले आहेतच, त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या नीतीमूल्यांविषयीही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या या काही गोष्टी - 

  1. एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊ शकते ... म्हणूनच सुरुवातीपासूनच आपल्या जीवनाप्रती गंभीर रहा. 
  2.  जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं. 
  3.  इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे जीवनात जर तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर स्वतःला बदला. 
  4.  कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत रहाणं फार सोपं असतं पण त्यातला चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं... ते करायला शिका. 
  5.  जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांच्याजवळ भरपूर आहे आणि त्यांना ते इतरांना द्यायला आवडतं. पण जगात अशीही माणसं आहेत ज्यांना अशा माणसांचा गैरफायदा घेता येतो... त्यामुळे परोपकार करताना नेहमी सतर्क रहा. 
  6.  आपण कोणाचीच परिस्थिती बदलू शकत नाही पण आपण इतरांना त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जरूर मदत करू शकतो आणि ती आपण करावीच. 
  7.  शिक्षणानीच गरिबी दूर होऊ शकते हे मला ठामपणे वाटतं. 
  8.  अनेक गोष्टी, अनेक संधी या अनेकांना नशीबानेच मिळून जातात. म्हणूनच ज्यांना त्या मिळाल्या आहेत त्यांनी अशा गुणवान लोकांना मदत करावी ज्यांच्याजवळ हे सगळं नाहीये. 
  9.  तुमच्यावर जशी वेळ आली तशी इतर कोणावर येऊ नये यासाठी परोपकार करा.