लेखक तथा प्रेरणादायी वक्ता सायमन सिनेक यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

ब्रिटीश अमेरिकन लेखक तथा प्रेरणादायी वक्ता म्हणून सायमन सिनेक जगप्रसिद्ध आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. स्टार्ट वुईथ व्हाय, लीडर्स इट लास्ट, टुगेदर इझ बेटर, फाईंड युअर व्हाय, दी इन्फायनाईट गेम ही त्यांनी लिहीलेली पाचही पुस्तके प्रचंड गाजली. जाणून घेऊया, सायमन सिनेक यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी.. 

  1. काही जणांना फक्त अडथळेच दिसतात, काही जणांना अडथळे पार केल्यावर काय मोठं मिळेल ते दिसतं. अडचणी की यश हा निर्णय मात्र तुमचा असतो. 
  2.  जसं निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे तसाच तो इतरांनाही आहे. कोणताही निर्णय घ्यायला दुसरी व्यक्तीही स्वतंत्र आहे. त्यामुळे इतरांच्या निवडीचा सन्मान करा. 
  3.  तुमच्या यशाचं श्रेय तेव्हाच तुम्हाला दिलं जातं जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांचीही जबाबदारी स्वीकारता. यशाचं श्रेय आणि चुकांची जबाबदारी दोन्हीही सोबतच येतं. 
  4. तुम्ही किती वेगवान आहात, तुम्ही किती टफ आहात किंवा तुम्ही किती स्मार्ट आहात, यापेक्षा तुम्ही किती जास्त मदतगार आहात यानेच फरक पडतो. 
  5.  जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला त्या यशाबरोबरच मिळायला लागतील. जसं की आदर, लोकप्रेम किंवा आणखी काही.. पण हे सगळं तुम्हाला नव्हे तर तुम्ही जो अधिकार प्राप्त केलाय त्यालाच मिळत असतं हे लक्षात ठेवा.
  6.  वृथा अहंकार बाळगण्यापेक्षा मदत मागण्याचं कौशल्य शिका. मदत करायला शिका आणि मदत घ्यायलाही शिका. जग एकमेकांच्या आधाराने चालतं हे लक्षात ठेवा. 
  7.  तुमचा स्टाफ कसा आहे, तो किती कार्यक्षम आहे आणि तो किती आनंदाने त्याचं नियत काम दररोज पूर्ण करतोय, हे सगळं त्याच्यावर नव्हे तर तुमच्या नेतृत्त्वगुणावर अवलंबून असतं. 
  8.  निराश होऊन चालत नाही, संयमाने पुढे जात रहावं लागतं. जीवन फुलायला वेळ लागतो, तोवर संयम बाळगून स्वतःला घडवावं लागतं. 
  9.  आपलं मत नेहमी शेवटी मांडा, कारण यामुळे आधी बोलणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही हा विश्वास देता की तुम्ही त्यांचं ऐकून घेताय आणि तसंच तुम्हाला इतरांनी जे बोललं नाही, ते बोलण्याची संधी मिळते.