लाखमोलाचं आर्थिक स्वातंत्र्य

(#Friday_Funda)

शाहरूख खान एकदा म्हणाला होता, " Don't be a philosopher or a teacher without being rich. Money is significant - earn it when you can."
अर्थात, " जोपर्यंत तुम्ही श्रीमंत होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना फिलॉसॉफी झाडू नका किंवा दुसऱ्यांना शिकवायलाही जाऊ नका, पैशाला फार किंमत आहे, म्हणूनच जेव्हाही पैसे कमावण्याची संधी मिळेल तेव्हा ती दवडू नका."

पैशांकडे बघण्याचे दोन अगदी भिन्न असे दृष्टीकोन आढळतात. एक प्रवाह म्हणतो, की पैशाने सुख विकत घेता येत नाही तर दुसरा प्रवाह म्हणतो, की पैशाशिवाय जगात सुख मिळत नाही. यापैकी तुमचा दृष्टीकोन कोणताही असू देत, यातील वास्तव असं आहे की जगण्यासाठी पैसा लागतोच आणि म्हणूनच प्रत्येकाला पैसा कमावता आला पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्यही मिळवता आलं पाहिजे.

या 10 मार्गांनी मिळवा आर्थिक स्वातंत्र्य -

1) तुमच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वप्रथम नीट आढावा घ्या -
सर्वप्रथम तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याचा नीट आढावा घ्या. त्याबरोबरच तुमची आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या काय ती विचारपूर्वक लिहून काढा. जर तुमच्यावर काही कर्ज असतील तर ती कशी फेडता येतील याचा विचार करा. एकंदरीतच तुमचं रहाणीमान, तुमच्यावरील कर्ज आणि तुमची मिळकत यांचा ताळमेळ बसवा आणि त्यानुसार तुमच्या इच्छित आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचा.

2) कर्ज फेडण्याची सोय आधीच करून ठेवा -
निवृत्तीपश्चात पुरेसा पैसा जमवणं अनेकांना फार कठीण वाटतं याचं कारण म्हणजे, त्यांच्या डोक्यावर अनेक प्रकारची कर्ज असतात. सधन व्हायचं असेल तर आधी तुमच्या खिशाला नेमकी कुठून कुठून आर्थिक गळती लागलीये ती कारणं शोधायला हवीत. त्यांपैकी एक कारण म्हणजे कर्ज. म्हणूनच, आधी कर्ज परत फेडण्याची सोय करा. ती कशी करायची याचं नियोजन करा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG
येथे क्लिक करा.
================

3) आपत्कालीन परिस्थितीत गाठीला पैसा हवा -
इमर्जन्सी फंड अर्थात आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला ठेवलेला पैसा. अनेक आर्थिक सल्लागारांच्या सांगण्यानुसार, हा पैसा किमान तुमच्या तीन ते सहा महिन्यांच्या खर्चाइतका राखीव बाजूला ठेवलेला हवा. तसंच, हा निधी अल्ट्रा लिक्विड इन्स्ट्रुमेंट्सच्या स्वरूपात हवा उदा. अल्ट्रा शॉर्ट टर्म डेब्ट फंड्स, लिक्वीड फंड्स, शॉर्ट टर्म फंड्स वगैरे.
समजा, तुमचा महिन्याचा खर्च 20 हजार रुपये असेल, यात सगळी महिन्याची बिलंही आपण समाविष्ट केली तर त्याच्या अनुसारे तुमचा इमर्जन्सी फंड हा साधारण 60 हजार के 1 लाख 20 हजार इतका हवाच.

4. आर्थिक नियोजन शिका आणि खर्चावर लक्ष ठेवा -
आर्थिक नियोजन प्रत्येकानेच शिकायला हवे, त्याचबरोबर आपण किती आणि कुठे कुठे खर्च करतोय याकडे काटेकोरपणे लक्ष्य ठेवायला हवे. या दोन्हीही सवयी आपल्याकडे फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही बारकाईने हे लक्ष द्याल की तुमचा पैसा कुठे कुठे आणि कसा कसा तुम्ही खर्च करताय, तेव्हा तुम्ही वायफळ खर्चाला कात्री लावायला आपसुकच शिकाल आणि पैसा वाचवायला शिकाल.
लक्षात ठेवा, तुमची आय पाहून व्यय करा, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ऑनलाईन टूल्स आहेत त्यांचाही उपयोग करून तुम्ही ही सवय स्वतःला लावू शकता.

5. उत्पन्नाची जास्त साधने असावीत -
एकाच उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून रहाण्यापेक्षा, अधिकाधिक साधनांनी उत्पन्न वाढवत न्यावे. तसंच हे जादाचं उत्पन्न अगदी हातोहात नीट इन्व्हेस्ट करून आपल्या वृद्धापकाळाची सोय करून ठेवावी.

6. टॅक्स प्लॅनिंग योग्य प्रकारे करा. -
प्रतिवर्षी 1.5 लाख रूपये इतकी गुंतवणुक सेक्शन 80 सी च्या अंतर्गत करून तुम्ही तुमची टॅक्स लायेबिलिटी कमी करू शकता. योग्य गुंतवणुकीचा प्लॅन निवडून नीट टॅक्सचे नियोजन तर करता येतंच, त्याचबरोबर तुम्ही तुमचे लाँग टर्म गोल्सही साध्य करू शकता, हे सहज शक्य आहे.

7. इन्शुरन्स कव्हर हे पुरेशा रकमेचे केलेले असावे -
इन्शुरन्स प्लॅन घेतल्याने तुम्ही कोणत्याही संकटकाळी सुरक्षित राहू शकता. लाईफ इन्शुरन्स केलेला असेल तर तुमच्या पश्चात तुमच्यावर अवलंबुन असलेले व्यक्ती, तुमचे कुटुंबीय वगैरे नीट आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकतात. साधारणतः असे म्हटले जाते की इन्शुरन्स कव्हर तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 12 पट असला पाहिजे. समजा, तुम्ही 7 लाख रुपये वर्षाला कमावत असाल तर तुम्ही सुमारे 70 ते 84 लाख रुपये इन्शुरन्स कव्हर घेतला पाहिजे. व्यक्तीपरत्वे, व तुमच्या प्राधान्यक्रमानुसार यात बदल होऊ शकतात, मात्र तुम्हाला साधारण एक ठोकताळा माहिती असेल तर तुम्ही त्यानुसार विमा उतरवण्याचा प्रयत्न करू शकता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

8. योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडा -
दरमहा थोडा थोडा पैसा बाजूला काढत चला. अशा प्रकारे पैसा जोडणे हे फार महत्त्वाचे आहे. साधारणतः सुरक्षित असलेल्या मार्गांमध्ये पैसा गुंतवणे शिका. तसंच, जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरूवात कराल तितकं उत्तम. असेट अलोकेशन हे एक तंत्र आहे ते शिका व त्याचा उपयोग करा.

9. तुमच्या गुंतवणुकीकडे नीट लक्ष द्या -
समजा, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केलीत तर उत्तम अशा म्युच्युअल फंड्समध्ये किंवा फंडामेंटली स्ट्राँग स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केलीत आणि दीर्घकाळसाठी ती गुंतवणूक केलेली असेल तर त्याचा नीट ट्रॅक ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.

10. विश्वास बाळगा -
आपलं आर्थिक उद्दीष्ट साध्य करणं आपल्याला शक्य आहे असा ठाम विश्वास मनात सदैव बाळगा व त्यानुरूप वागा. अनेक लोकांची आर्थिक घडी नीट न बसण्यामागचं कारण हेच आहे की त्यांचा स्वतःवर विश्वासच नसतो. वास्तवापासून कोसो दूर असलं तरीही हेच सत्य आहे. यासाठी अगदी छोट्या छोट्या आर्थिक निर्णयांपासून सुरुवात करा. खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्याची सवय लावा. तसंच, आर्थिक बाबतीत तुमचं लक्ष्य हे सर्वात अग्रणी असू देत. अन्य कोणत्याही आर्थिक मुद्द्यामध्ये नेहमीच तुमच्या आर्थिक बाबतीतील तुम्ही ठरवलेलं उद्दीष्ट हे सर्वात प्रथमच असेल हे बघा.

असं केल्यानंतर तुमची आर्थिक घडी बसण्यास हळूहळू मदत होईल व लवकरच तुम्हीही वरील एकेक मुद्दा आचरणात आणून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात यशस्वी व्हाल.
पर्सनल फायनान्स एक्स्पर्ट पैसे कमावून श्रीमंत होता येत नाही तर पैशाने पैसा कमावून श्रीमंत होता येतं . गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य, आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येतं. ते कसं करायचं हे सोप्या मराठीतून शिकविणारा नेटभेटचा मराठी ऑनलाईन कोर्स अवश्य पहा ! - https://salil.pro/PFE

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com