लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग ट्यूटोरिअल आणि कोडींग शिकविणाऱ्या पाच फ्री वेबसाईट्स

(#Web_Wednesday)

ऑनलाईन शाळा सुरू होऊन आता वर्ष लोटलंय. विद्यार्थ्यांना हल्लीच्या काळात कम्प्युटरचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालंय, म्हणूनच अशा काळात जर तुमच्या पाल्याला घरबसल्या तुम्हाला कम्प्युटरविषयी अधिकाधिक ज्ञान द्यायचं असेल तर त्यासाठी कम्प्युटर आणि इंटरनेट ही दोन माध्यमंच उपयोगी ठरू शकतात. कशी ? चला जाणून घेऊया -

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच जर या विषयी थोडे थोडे शिक्षण मुलांना मिळाले तर ते भविष्यात नक्कीच या क्षेत्रात छान प्रगती करू शकतात. लहान मुलांना कोडींग शिकवणारे अनेक ट्यूटोरिअल्सचे व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कोड काँबॅट, कोड डॉट ओआरजी, टिंकर, प्लुरल साईट आणि खान अकॅडमी या प्रोग्रामिंग शिकवणाऱ्या पाच उत्तम साईट्स आहेत. या साईट्सविषयी -

✔️ https://codecombat.com/ -
साधारणतः नऊ वर्षाच्या पुढील मुलामुलींकरिता घरबसल्या कोडींग शिकवणारी ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर या वेबसाईटला शिक्षकही जॉईन करू शकतात. हा एक कम्युनिटी प्रोजेक्ट असून इथे शेकडो प्लेयर्स आहेत. लेव्हल्स क्रिएट करणे, कोडींगमध्ये नवनवीन फीचर्स आणण्यासाठी तत्पर असणे, बग फिक्स करणे, प्लेटेस्ट घेणे आणि त्याचबरोबर तयार झालेला गेम तब्बल पन्नास भाषांमध्ये भाषांतरीत करणे या सर्वांमध्ये हे प्लेयर्स सहभागी होऊन कोडींगचं अँप्लिकेशन स्वतः शिकू शकतात. इंटरॅक्टीव्ह आणि काँपिटिटीव्ह गेमप्ले मोडमध्ये हे सर्व शिक्षण चालते. यासाठी या वेबसाईटवर लॉगिन केल्यावर लगेचच तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता.
जावा, पायथन,एचटीएमएलएस, सीएसएस, जेक्वेरी आणि बूटस्ट्रॅप अशा कम्प्युटर भाषेचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे.

✔️. खान अकॅडमी (https://www.khanacademy.org/) -
या वेबसाईटवर गणितीय खेळ तर आहेतच परंतु त्याचबरोबर बेसिक प्रोग्रामिंग ट्यूटोरिअल्सही लहान मुलांकरिता आहेत. या ट्यूटोरिअल्सच्या माध्यमातून ग्राफिक्स, एनिमेशन, इंटरॅक्टीव्ह व्हिज्युअलायझेशन शिकता येऊ शकते. शाळेशिवाय स्वतंत्रपणे तुम्ही यामाध्यमातून शिकू शकता. तसंच, यावर विविध उपयुक्त माहिती देणारे व्हिडीओज, प्रॅक्टीस एक्सरसाईज वगैरे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

✔️. टिंकर (https://www.tynker.com/) -
प्रोग्रामिंग शिकणं या वेबसाईटवरून खूप सोपं आणि आनंदाचा भाग असल्याप्रमाणे आहे. 5 ते 13 वयोगटातील विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरून काही भाग निःशुल्क वापरता येऊ शकतो. कोड्सचे ब्लॉक्स अरेंज करून लहान मुलं यावरून विविध मोबाईल एप्स आणि गेम्स स्वतः तयार करू शकतात. त्यांच्या कल्पना वापरून ते एनिमेटेड गोष्टी तयार करू शकतात आणि गणितातील गंमतही अनुभवू शकतात. यावरच पुढची पायरी म्हणजे सिंटॅक्स वापरून प्रोग्रामिंग देखील शिकायला मिळते.

✔️. https://code.org/ -

ही एक नॉनप्रॉफीट संस्थेची वेबसाईट असून यांचा उद्देश संगणकीय ज्ञान देणे विशेषकरून महिला व मागासवर्गीय मुलांपर्यंत हे ज्ञान पोचवणे असा यांचा उद्देश आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकीय ज्ञान व शिक्षण मिळावे याकरिता ही संस्था कार्यरत आहे. या वेबसाईटवर कोडींगबद्दलचे सगळे कोर्सेस विनामूल्य उपलब्ध आहेत.

✔️ https://www.pluralsight.com/ -

यांचा उद्देश आहे, सर्वांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगती करण्याची समान संधी मिळावी तसंच भविष्यासाठी उपयुक्त असलेली आत्मकौशल्यही शिकायला मिळावीत. त्याकरिता या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. यावरही कोडींग आणि प्रोग्रामिंगमधील अनेक कौशल्य, तंत्र शिकवणारे व्हीडीओज, माहिती देण्यात आलेली आहे. वेब डेव्हलपमेंट, जावा स्क्रिप्ट, पायथॉन, सी प्लस प्लस, जावा, मोबाईल डेव्हलपमेंट, सी# आणि नोड डॉट जेएस आदी लँग्वेजेस यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com