जर तुम्ही कोल्ड कॉलिंग करत असाल तर या ३ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

वेग 🏃🏻‍️ , स्वर (टोन) 🗣 आणि ऊर्जा (एनर्जी) 🔋

वेग (Pace) 🏃🏻‍

फोनवर बोलताना तुमच्या बोलण्याचा वेग अगदी मंदावलेला असेल तर तुम्ही निराश होऊन त्यांच्याशी बोलताय किंवा तुम्ही जे बोलताय त्यामध्ये तुमचा लक्ष नाही आहे असे समोर तुमच्याशी बोलत असलेल्या व्यक्तिला वाटते.

याउलट जर जास्त वेगाने बोललात तर तुम्ही घाईत आहात किंवा तुमच्याशी बोलून ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत असे त्यांना वाटायला लागते.

स्वर (Tone) 🗣

तुम्ही अत्यंत गंभीर स्वरात त्यांच्याशी बोललात तर जो एक प्रकारचा खेळीमेळीचा संवाद सुरु व्हावा लागतो किंवा बोलण्यामध्ये रॅपो तयार व्हावा लागतो तो तयार होत नाही .

याउलट जर तुम्ही अगदी उत्साही स्वरात त्यांच्याशी बोललात तर त्यांना ते ओझे लादल्यासारखे वाटू शकते किंवा त्यांना तुम्ही जेवढा आव आणताय तेवढे तुम्ही अनुभवी नाही आहत असे देखिल वाटू शकते.

ऊर्जा (Energy) 🔋

कमी ऊर्जेने बोलाल आणि तुम्हाला त्यांना तुमच्या बोलण्यात रस वाटावा म्हणून एकप्रकारे झगडावे लागेल याउलट जास्त शक्ति ओतून बोलायला गेलात तर त्यांना तुमचं अति आनंदाने बोलणे खपणार नाही.

अता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल बोलताना वेग, स्वर (टोन) आणि ऊर्जा (एनर्जी) या तिन्ही गोष्टी कमी पण नाही करायच्या ना जास्त करायच्या मग नेमकं करायचं काय?

फक्त एकच करा तुम्ही ज्यांच्याशी बोलताय त्यांच ऐका.

आपल्याला त्यांच्या बोलण्यातील वेग, स्वर आणि ऊर्जा यांच्याशी आपला मेळ साधायचा आहे जेणेकरुन आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांनी आपल ऐकावं, त्यांना आपल्या बोलण्यात रस वाटावा त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे ते आपल्याशी कशाप्रकारे बोलत आहेत हे ऐकणे, समजून घेणे आणि त्याप्रमाणे आपल्या बोलण्यातील वेग, स्वर आणि ऊर्जा मिळतीजूळती ठेवणे.

ते जसे बोलत आहेत त्याप्रमाणे आपल्या बोलण्यात बदल करा आणि ते तुमच्याशी संवादात जोडले जातील.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com