इकीगाई - जपानमधील माणसांच्या दीर्घ व आनंदी जीवनाचं रहस्य सांगणारं पुस्तक 

#Saturday_bookclub

जपानमधील लोकांचा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येकाकडे 'इकीगाई' आहे. 'इकीगाई' शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न सहजच तुमच्या मनात आला असेल. 'इकीगाई' हा एक जॅपनीझ शब्द आहे आणि याचा अर्थ आहे, 'तुमच्या जीवनाचं, तुमच्या आनंदाचं कारण' किंवा 'तुमच्या असण्याचं कारण' किंवा, 'तुमच्या आनंदी जीवनाचं कारण' .. इकीगाई शब्दाची आणखी एक व्याख्या करता येते ती म्हणजे the happiness of always being busy or engage अर्थात, इकी म्हणजे (लाईफ) जीवन आणि गाई म्हणजे रिझल्ट .. अर्थात आनंदी जीवनाचा परिणाम किंवा जीवनाचं कारण ..

190 पानांच्या या पुस्तकात जीवन आनंदाने जगण्याच्या कलेबद्दल सांगितलं आहे. असं म्हणतात, की जपानी माणसं दीर्घायुषी असतात तसंच त्यांचं जीवन हे अधिक अर्थपूर्ण अशा पद्धतीने ते जगतात. हे सगळं या जॅपनीझ माणसांना कसं जमतं याचंच रहस्य या पुस्तकात लेखक हेक्टर गार्शिया आणि फ्रान्सेस्क मिरेल्स यांनी सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकात नेमकं त्यांनी काय सांगितलंय -

✔️ रोज सकाळी बिछान्यातून उठण्याचं तुमचं कारण शोधा -
तुमच्यामध्ये काही ना काही युनिक टॅलेंट देवानं दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही खरंतर जगत आहात पण ते कारण जोवर नेमकं तुम्हाला सापडत नाही तोवर तुमचं जीवन हे तितकं फुलणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचं मूळ उद्दीष्ट काय ते आधी शोधा... थोडक्यात दररोज बिछान्यातून उठून जीवनाला थेट भिडण्यासाठी तुमचं स्वतःचं असं काय कारण आहे ते शोधा.

✔️ व्यवस्थित जेवा -
अनेक लोक हे एकतर कमी जेवतात किंवा अति खातात. या दोन्हीही सवयी फार घातक आहेत. साधारण 80 टक्के पोट भरलेलं असावं अर्थात, आपण भरपेट जेऊन सुस्तही होऊ इतकंही अन्न खाऊ नये आणि आपण अर्धपोटी उपाशीही राहू नये. नेहमी पोटात थोडीशी जागा ठेवावी. असं करण्यामागची शास्त्रीय कारणंही अनेक आहेत तुम्ही हवंतर त्याचा आढावाही पुस्तकात घेऊ शकता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

✔️ इतरांशी घट्ट नातं जपा -
तुमच्या जीवनात समस्या असो वा नसो, तुमचे जे इतरांशी बंध आहेत ते नेहमी चांगले आणि घट्ट असू देत. लक्षात घ्या, तुमच्या जवळची माणसं तुमच्यावरचा ताण कमी करण्यासाठी नेहमी मदत करतात. एखाद्या जवळच्या मित्रमैत्रिणीशी मन मोकळं केल्याने, किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मन मोकळं केल्याने तुमचा ताण हलका होऊ शकतो. म्हणून नेहमी, इतरांशी चांगले नाते जोपासा.

✔️ नेहमी सक्रीय रहा -
दररोज काम करा..दररोज सक्रीय रहा.
समजा तुम्ही तुमची कार खूप दिवस वापरलीच नाहीत, ती नुसती एका जागी उभी करून ठेवलीत तर थोड्याच दिवसात ती गंजून जाईल, शिवाय ती वेळेवर उपयोगीही पडणार नाही. हीच बाब आपल्या शरीरालाही लागू आहे. म्हणून शरीराचे चलनवलन होईल अशा क्रीया करा. दररोज थोडा व्यायाम करा. लिफ्टऐवजी जिन्याने चढउतार करा, दररोज पायी फिरायला जा... लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही स्पर्धेत चॅम्पियन बनायचे नाहीये.. त्यामुळे शरीराला झेपेल इतका पण नेमाने दररोज थोडा थोडा व्यायाम करा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

हे सगळे महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात सविस्तर सांगितलेले आहेत. जर तुम्हाला एक छान उत्साही आनंदी आणि कार्यक्षम व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

लक्षात घ्या, आपण जे सातत्याने करतो तेच खरे आपण असतो. एखाद्या कृतीने यशस्वी होता येत नाही तर सातत्याने व सवयीने चांगलं जीवन जगण्याचा ध्यास तुम्हाला यशापर्यंत आपोआप नेतो.

या पुस्तकाची मराठी आवृत्ती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा - https://amzn.to/3yNStcH

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया