या 5 टिप्सनी वाढवा तुमच्या कम्प्युटरचा स्पीड 

(#Techie_Tuesday)

1. Disable Unwanted start-up programs -
जेव्हाही तुम्ही तुमचा लॅपटॉप वा कम्प्युटर सुरू करता तेव्हा अशी अनेक applications असतात, जी त्यासोबतच सुरू होऊन जातात आणि प्रत्यक्षात तुम्हाला त्यांची गरजही नसते. अशी सगळी startup applications तुम्ही disable करायला हवीत. यामुळे तुमचा कम्प्युटर वारंवार hang होणार नाही व त्याचा स्पीडही वाढेल. ही apps delete करण्यासाठी alter+control+delete कमांड द्या. त्यानंतर task manager ओपन होईल त्यात वर दिलेल्या मेन्यूमधून startup option सिलेक्ट करा. आता खाली जी यादी उघडेल त्यापैकी केवळ अँटीव्हायरस व मायक्रोसॉफ्ट ऑफीसपैकी जे पर्याय दिसतील तेवढेच enable ठेऊन अन्य अनवॉन्टेड प्रोग्राम्स disable करा.

2. System Performance -
तुमच्या सिस्टमचा स्पीड वाढवण्यासाठी त्या सिस्टमचा परफॉर्मन्स वाढवायला हवा. तो कसा वाढवायचा, त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा - control panel ओपन करात्यात system वर क्लिक करून advanced system settings ओपन करा.त्यात तुम्हाला performance असा पर्याय सापडेल, त्याचे सेटींग्ज ओपन करा.त्या सेटींग्जमध्ये adjust for best appearance पर्याय निवडून तो apply करून ok वर क्लिक करा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

3. Defragment and optimize drive -
हा देखील एक उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कम्प्युटरचा वा लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. त्यासाठी तुमच्या सिस्टीमच्या कीबोर्डवर windows चं बटन क्लिक केल्यावर तुम्हाला Defragment and optimize drive हा ऑप्शन मिळेल. त्यात C drive क्लिक करताच त्याखाली optimize हा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही C drive optimize करू शकता.

4. Delete temp files -
Windows key+R ही कमांड देऊन किंवा स्टार्ट मेन्यूमध्ये Run ऑप्शन क्लिक करून एक छोटी विंडो उघडते. त्यात %temp% ही कमांड टाईप करून run करा. त्यानंतर ज्या फाईल्स ओपन होतील त्या सगळ्या temperary files delete करून टाका. त्यानंतर पुन्हा एकदा Run मेन्यू ओपन करून यावेळी त्यात फक्त temp ही कमांड टाईप करून पुन्हा एकदा ओपन झालेल्या सगळ्या temperary files delete करा. आता आणखी एकदा run मेन्यू ओपन करा, त्यासाठी windows key+R ही कमांड वापरू शकता आणि ओपन झालेल्या छोट्या बॉक्समध्ये prefetch ही कमांड टाईप करा. आता सिस्टम तुम्हाला परवानगी मागेल, त्यानंतर allow access म्हणून continue करा आणि पुन्हा एकदा सगळ्या temperery files delete करून टाका. यामुळे तुमच्या सिस्टीमचा स्पीड काहीसा वाढण्यास मदत होईल.

5. Disk clean up -
तुमच्या सिस्टमचा C drive ओपन करा. त्यासाठी My Computer वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर C Drive वर right click करा आणि properties ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला disc clean up ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सिस्टममधील फाईल्स क्लीनअप करू शकता, मात्र त्यासाठी थोडा वेळ लागतो हे लक्षात घ्या.

मित्रांनो, वरीलपैकी कोणत्याही पर्यायाने जेव्हा तुम्ही तुमच्या सिस्टमचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा शेवटी तुमची सिस्टीम एकदा बंद करून पुन्हा सुरू करायला विसरू नका. त्यानंतर तुमच्या सिस्टीमचा स्पीड काही प्रमाणात वाढलेला जाणवेल तसंच वारंवार जर सिस्टीम हँग होत असेल तर तेही कमी होईल. मात्र, जर तरीही प्रॉब्लेम येत राहिला तर तुमची सिस्टीम योग्य व अधिकृत संगणक तंत्रज्ञाला दाखवणेच उत्तम हे लक्षात ठेवा. तसंच, जर वरीलपैकी कोणताही पर्याय वापरताना काही अडचण आली तर चुकीची कमांड देऊ नका तसे केल्याने तुमच्या सिस्टममधील महत्त्वाची माहिती, फाईल्स व अन्य data currupt होऊ शकतो किंवा कायमस्वरूपी डिलीटही होऊ शकतो. त्यामुळे सावधानतेने हे पर्याय वापरा व येत नसल्यास योग्य त्या संगणक तंत्रज्ञांची मदत घ्या.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com