आज आंतरराष्ट्रीय योग दिवस

21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणूनही आपल्याला माहिती आहे. याच दिवसाला अयन दिन असेही म्हटले जाते. आजच्या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला असतो, या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरणे थेट माथ्यावर आलेली असल्याने इथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. म्हणूनच आजच्या दिवशी येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.

या कारणास्तव या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला जावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत प्रस्ताव मांडला होता. डिसेंबर 2014 मध्ये त्यास संपूर्ण मान्यता मिळाली व त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 मध्ये साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त टीम नेटभेटने तयार केलेला हा खास व्हिडीओ .. आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा आणि आवर्जून शेअर करा.

धन्यवाद 

टीम नेटभेट