महिला दिन विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षीच येतो, पण या पोस्टचा संदर्भ केवळ तेवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर यामध्ये दिलेल्या प्रेरणादायक विचारांनी महिलांनी आपले जीवन बदलावे, आपली स्वप्न साकारावीत यासाठी स्वतःच्या अंगी धैर्य बाणावे आणि एक उत्तम व्यक्तिमत्त घडवावे याकरिता हे विचार शेअर करत आहोत. जरूर वाचा व आचरणात आणण्याचा प्रयत्न करा...

1. क्षमता तुम्हाला उंचीवर जरूर नेईल, पण चारित्र्य उत्तम असेल तरच तुम्ही त्या उंचीवर टिकून राहू शकाल हे लक्षात ठेवा. - नॉर्म स्टीवर्ट, जॉर्ज स्कोल्झ 

2. तुम्ही स्वतःला ओळखा आणि तीच व्यक्ती बना जी तुम्ही आहात, ते सत्य ओळखा आणि बघा तुम्हाला ते सगळं मिळेल जे तुम्ही डिझर्व करता. - एलन डिजेनरस

3. स्त्रियांना अद्याप एक गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे कोणीही तुम्हाला तुमचा अधिकार देणार नाही, तुम्हाला स्वतःलाच तुमचा अधिकार मिळवावा लागतो. - रोझान बार

4. "अतिरेकीसुद्धा सर्वात जास्त कोणाला घाबरले माहिती आहे..? - एका पुस्तक हातात घेतलेल्या मुलीला !" - मलाला युसुफझाई 

5. मैत्रिणींनो, जर तुम्ही स्वतःच तुमच्या कामाचा अनादर केलात तर तुमचीही किंमत इतरांच्या नजरेत शून्य होते हे लक्षात ठेवा. - ओपरा विनफ्रे

6.जोवर तुम्ही इतरांचं मन राखण्यासाठी स्वतःला मूर्खात काढण्याची तुमची सवय सोडणार नाही तोवर तुम्ही कधीही महान बनूच शकणार नाही ... - Cher 

7. आपल्या दैनंदिन कामांच्या यादीत स्वतःचं स्थान नेहमी अग्रणी ठेवायला आता आपल्याला शिकावंच लागेल... आपल्याला स्वतःला गंभीरतेने घ्यावंच लागेल.- मिशेल ओबामा 

8. "मी आजवर एकाही अशा महिलेला भेटलेले नाहीये जी दुबळी आहे ... मला वाटतं, दुबळ्या महिला या जगात नाहीच्चेत मुळी !" - Dian Von furstanburg 

9. मोहक स्त्री ही कधीच चारचौघींसारखी नसते, ती स्वतःच्या अंतर्मनाचंच ऐकते आणि म्हणूनच ती इतर महिलांमध्ये ठळकपणे उठून दिसते. - लॉरेटा यंग