ग्रेटभेट यशाचा GPS

नमस्कार मित्रांनो,
आयुष्य असो वा उद्योग त्यात यशस्वी होण्यासाठी आपण सर्वजण भरपूर कष्ट घेत असतो. प्रयत्न जरी पूर्ण असले तरी बऱ्याचदा दिशा बरोबर कळत नाही आणि म्हणून प्रत्येकाच्याच कष्टाचं रूपांतर यशामध्ये होत नाही. आपल्याला इच्छित यशापर्यंत अचूक पोहोचवणारा जीपीएस GPS सर आपल्याला सापडला तर ?

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला आपापला GPS शोधता यावा म्हणूनच नेट-भेट ई लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी एक जबरदस्त ग्रेट भेट आणत आहोत. त्यात कॉर्पोरेट लॉयर, India Power Talk या उपक्रमाचे संस्थापक आणि मुख्य म्हणजे मराठी बांधवांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणारे श्री नितीन पोतदार सर आपल्याला या Live कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात, तरुणांना करिअरमध्ये, उद्योजकांना व्यवसायामध्ये आणि एकंदरीत प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडेल असा GPS पोतदार सर आपल्यासमोर उलगडणार आहेत. ​

कार्यक्रमाची माहिती -
5 डिसेंबर 2020
संध्याकाळी 6 वाजता
(Youtube and facebook Live)

मित्रहो , या विषयात रस असलेल्या आपल्या मित्रमंडळींसोबत हा मेसेज अवश्य शेअर करा ! तर मग भेटूया ! ग्रेटभेट मध्ये ! ऑनलाईन !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
संस्थापक - नेटभेट ई लर्निंग सोल्युशन
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या !