टर्म लाईफ इन्शुअरन्सबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी (#Finance_Tuesday)

मित्रांनो,
टर्म लाईफ इन्शुअरन्सबद्दल आपल्या मनात प्रचंड गोंधळ असतो. हे पैसे नेमके कुठे जातात आणि ते सतत गुंतवल्याने आपला कसा फायदा होतो याबद्दल आपल्याला काहीच स्पष्टता नसते, त्यामुळे याबाबत अनेकजण उदास असतात. टर्म लाईफ इन्शुअरन्स घेणं अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. विशेषतः आपल्या जीवनात जे चढउतार येतात आणि जीवनाची अशाश्वतता जेव्हा आपल्याला ध्यानी येते तेव्हा जर आपल्याजवळ आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केलेलं नसेल तर आपल्याला विपन्नावस्था येऊ शकते. मात्र आपण तसा विचार करूही धजावत नाही. जेव्हा कुटुंबातील कर्ती व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीच्यावर संपूर्ण घर अवलंबून असतं अशी व्यक्ती अचानक मरण पावते त्यानंतर कुटुंबाची पूर्ववत जीवनशैली देखील टिकवणं अनेक कुटुंबांना अशक्य होतं. पैशांची कमी असल्याने पूर्वीसारखी चैन करणं परवडत नाहीच, तर कधीकधी मूलभूत गरजाही भागवणं महाकठीण होत जातं. आपल्यापैकी अनेक सुखवस्तू घरांमध्ये हा विचारही कधीच केला जात नाही, आणि अर्थातच अशी वेळ कोणावरही येऊ नये अशीच प्रार्थना आपण मनोमनी करत असतो.. पण तरीही, वेळ आपल्याला सांगून येत नाही आणि म्हणूनच या अशा संकटकाळाचे नियोजन करून ठेवणे केव्हाही उत्तमच.

टर्म लाईफ इन्शुअरन्सचे हफ्ते कसे व किती असावेत, ते कसे ठरवावेत याबद्दलही अनेकांच्या मनात अस्पष्टता असते. त्याविषयी कोणाकडे चर्चाही करणं त्यांना प्रशस्त वाटत नाही. भविष्यातील तुमच्या आर्थिक गरजा आणि सद्यस्थितीतील तुमची जीवनशैली या दोन्हींचा विचार करून योग्य तितके इन्शुअरन्स कव्हर घ्यावे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

समजा, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होण्याचे ठरवले आणि त्या व्यक्तीचे सध्याचे वय 30 वर्ष असेल तर साधारण एक अंदाजे त्या व्यक्तीने निवृत्ती वयातून सध्याचे वय वजा जाता, म्हणजे 30 वर्षांसाठी टर्म पॉलिसी घेतली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाच्या तिशीत 25 वर्षांच्या काळासाठी पॉलिसी घेतली असेल तर त्या व्यक्तीला वयाच्या 55 व्या वर्षी जर पॉलिसी रिन्यू करावी लागेल, मात्र जर तेव्हा ती व्यक्ती आजारी असेल, वा आरोग्य समस्येशी झुंजत असेल तर त्या वयात पॉलिसी रिन्यू करणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य होईल. मात्र, याऐवजी जर त्या व्यक्तीने आपल्या वयाच्या तिशीतंच थेट आपल्या निवृत्तीपर्यंतचा कार्यकाळ इन्शुअर्ड करून ठेवला, तर त्याला अधिक फायदा होईल.

आता अर्थातच तुम्हाला प्रश्न पडला असेल नं, की वयाच्या तिशीत पॉलिसी घेण्याबद्दल वारंवार का सांगितलं जात आहे, तर याचं कारण म्हणजे, भारतात इन्शुअरन्सकडे गुंतवणूक या दृष्टीने पाहिलं जातं, याऐवजी, इन्शुअरन्सकडे आपल्या जीवनाचं प्रोटेक्शन, कव्हर, संकटकाळासाठी आर्थिक भक्कम बाजू अशा दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे. असा विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल, की जी व्यक्ती वयाच्या तिशीत घर चालवू लागली आहे, तिचं जीवन व त्या व्यक्तीच्या पश्चात तिच्या कुटुंबियांचं जीवन जर त्याचप्रकारे सुस्थितीत रहावं असं वाटत असेल तर टर्म इन्शुअरन्स वयाच्या तिशीतच करून ठेवणं किती महत्त्वाचं आहे. जीवनाची अशाश्वतता आपण कितीही अमान्य केली तरीही तेच जीवनाचं सत्य आहे, प्रत्येकाच्याच .. हे लक्षात ठेवलं पाहिजे.

या लेखाचा 1ला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/Why-it-is-important-to-take-a-term-policy-finance-tuesday

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com