विडिओ बघून शिकताय ? आता थेट विडिओ सोबत बोलून शिकता येईल !


AI च्या मदतीने थेट व्हिडिओ सोबत बोला !
मंडळी कालच्या लेखात आपण पुस्तकांना AI च्या मदतीने बोलतं कसं करता येईल ते पाहिलं. ते पाहिल्यानंतर आपोआप पुढचा प्रश्न उपस्थित होतो की पुस्तकांप्रमाणेच व्हिडिओ पूर्ण न बघता व्हिडिओलाच प्रश्न विचारून त्यात काय सांगितले आहे त्याची थेट उत्तरं मिळवता आली तर ?
मित्रांनो, त्यासाठी पण टूल AI च्या जगात उपलब्ध आहे. इतकं सोपं की फक्त व्हिडिओ ची लिंक कॉपी पेस्ट करायची आणि व्हिडिओ मधील कोणती माहिती पाहिजे आहे त्याबद्दल प्रश्न विचारायचे.
बऱ्याच वेळा एखादा मोठा व्हिडिओ असेल आणि त्यातला एखादा नेमका मुद्दा शोधायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागतो किंवा सतत मागेपुढे करावा लागतो. यात बराच वेळ वाया जातो. यासर्वांवर उपाय उपलब्ध करून दिला आहे AskVideo .AI या टूल ने.
कॉलेज/युनिव्हर्सिटी मधील ऑनलाईन lectures, डॉक्युमेंटरीज, ऑनलाईन युट्युब व्हिडिओ असतील अशा सर्वांचाच अभ्यास करणे AskVideo टूल मुले सोपे आणि सहजसाध्य होणार आहे.
============================
➡️ मराठी माणसाला AI युगासाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न !
AI जगतातील अशा अनेक घडामोडी आणि युक्त्या सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. 📚
https://chat.whatsapp.com/LaEMHKblZFy1Mwn4g5IIvR

============================
सध्या हे टूल इंग्रजी भाषेमधील व्हिडिओ साठीच चांगले काम करत आहे. तसेच यांच्या फ्री प्लॅन मध्ये दर महिन्याला ३ व्हिडिओ चा भ्यास करता येतो आणि २० प्रश्न विचारता येतात. यापेक्षा अधिक वापरासाठी paid plan उपलब्ध आहेत.
आहे की नाही हे टूल भन्नाट ? स्वतः वापरून बघा आणि तुम्ही या टूलचा आणखी creative वापर कुठे करू शकता ते मला कमेंट्स मध्ये अवश्य सांगा !


धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !