स्टीव्ह जॉब्सने दिलेले ध्यानधारणेविषयक काही धडे

भारतात तब्बल 7 महिने स्टीव्ह जॉब्स वास्तव्याला असताना त्यांना ध्यानधारणेविषयी प्रचंड आत्मीयता वाटू लागली. आपल्या येथील वास्तव्यात त्यांनी जे शिकले ते त्यांनी जगाला सांगितले. 

1. जर तुम्ही मनाला शांत करायला जाल तर मन तितकंच चलबिचल करेल पण थोडा वेळ दिलात तर मन शांत होईल. आता हलकेच तुमचं अंतर्ज्ञान जागृत होईल आणि सगळ्या गोष्टी स्पष्टपणे उमगतील. आता तुम्ही वास्तवात याल.

2. जर तुम्ही काहीच न करता शांत बसलात, तर तुमचं तुम्हाला जाणवेल तुमच्या मनात किती खळबळ आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनात सतत विचारचक्र सुरू असतं. 

3. आणि हेच अशांत मन जेव्हा तुम्ही शांत करता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या मनाची शक्ती आता कितीतरी पटींनी जास्त आहे. तुम्हाला त्या असंख्य गोष्टी जाणवायला सुरुवात होईल ज्याकडे पूर्वी तुमचं लक्ष्यही गेलं नव्हतं. 

4. सरतेशेवटी एकच महत्त्वाचं, की ध्यानधारणा ही सरावाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही नित्यनेमाने ध्यानधारणा करणार नाही तोवर तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होणार नाही.