या प्रेरणादायी विचारांनी आठवड्याची सुरुवात करा ! (#Monday_Motivation)

1. तुम्हाला सतत स्वतःविषयी स्पष्टीकरण कोणालाच देण्याची गरज नाही. स्वतःसाठी जगायला लागा, केवळ इतरांना प्रभावीत करण्यासाठी फक्त जगू नका.

2. सुरक्षित कोषात जगल्याने तुम्ही स्वतःच तुमचं जीवन उद्ध्वस्त करत आहात. सुरक्षित कोषातून ज्या क्षणी बाहेर पडाल त्या क्षणी तुमचं जीवन उमलू लागेल.

3. तुमचे मित्र आणि कुटुंबीय केवळ तुमचा आधार होऊ शकतात, प्रत्यक्षात कृती मात्र तुम्हाला स्वतःलाच करावी लागते हे लक्षात ठेवा.

4. झोप काढल्याने, आराम केल्याने किंवा केवळ सोशल मीडियावर वेळ घालवल्याने खरा आनंद कधीच मिळू शकत नाही. खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला स्वतःतील सर्वोत्तम देता. प्रत्येक क्षण भरभरून जगता.

5. जितक्या कमी लोकांबरोबर वेळ घालवाल, तितका कमी वेळच तुम्हाला दुसऱ्यांचा मूर्खपणा सावरण्यासाठी द्यावा लागेल. थोडक्यात काय, तर तुमचा वेळ वाचेल.

6. जे तुमच्याशी वाईट वागले त्यांचा सूड उगवण्यासाठी, त्यांच्यावर रागावण्यासाठी वा या गोष्टींमध्ये जीवनाचा वेळ घालवू नका, जीवन खूप लहान आहे. त्यामुळे कटू प्रसंग जाऊ द्या.. काळाच्या ओघात मागे टाका व नव्याने जीवन फुलवा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

7. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टींसाठी कधीच विलंब झालेला नसतो, तसंच त्या गोष्टी कधीच वेळेपूर्वीच तुम्ही सुरू केलेल्या नसतात.

8. तुम्ही जोवर खूप सुंदर किंवा खूप श्रीमंत किंवा जगप्रसिद्ध व्यक्ती झालेला नसता, तोवर कोणीही तुमची जास्त पर्वा करत नसतं, अटलीस्ट दीर्घकाळपर्यंत तर नाहीच नाही !

9. उत्तम वाचक हे नेते असतात. कधीही वाचन करणे सोडू नका.

10. आपण कितीही प्रयत्न केला तरीही काही काही गोष्टी या आपल्या हातात नसतातच !

11. तुम्ही जे जे पहाता किंवा ऐकता त्या सगळ्यावर विश्वास ठेऊ नका. नेहमी प्रश्न विचारा, तुमच्यातील कुतुहल कायम जागं ठेवा.

12. तुम्ही कोणाला आवडता आणि कोणाला आवडत नाही याने काही फारसा फरक पडत नाही, तुम्ही स्वतः स्वतःबद्दल काय विचार करता, तुम्ही स्वतःकडे कसं पहाता यानेच खरंतर फरक पडतो.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com