द वन थिंग (#Saturday_Bookclub)

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला वाटत असतं की आपण सगळ्यांच्या पुढे असलं पाहिजे, आणि त्याच विचारात अनेक जणं, अनेक कामांचा सपाटाच लावतात. अनेकांना वाटतं एकाच वेळी अनेक कामं केल्यामुळे आपण स्पर्धेत अग्रणी राहू आणि आपल्याला इतरांच्या कौतुकाचा धनी होता येईल. मात्र द वन थिंग या पुस्तकाच्या लेखकांनी मात्र यापेक्षा निराळा विचार मांडून आपल्याला जीवन जगण्याचा एक निराळा दृष्टीकोन दिलेला आहे.

द वन थिंग पुस्तकाचे लेखक गॅरी केलर आणि जे पापासन यांच्या या पुस्तकातून आपल्याला एकाच गोष्टीवर फोकस करून आपली उत्पादनक्षमता कशी वापरायची आणि तसे केल्याने जीवनात आपण किती उंची गाठू शकतो याबाबत सोदाहरण मार्गदर्शन करते. हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करण्याचा सल्ला हे पुस्तक आपल्याला देते.

1. द वन थिंग -

द वन थिंग म्हणजे अशी एकच गोष्ट ज्यावर पूर्ण लक्ष्य केंद्रीत करून आपण आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळवू शकतो. आपण आपल्यातील पूर्ण क्षमतेचा विचार करून आणि आपल्याला नेमका कशात रस आहे त्याचा विचार करून ती एक गोष्ट कोणती हे जाणू शकतो. लेखक म्हणतात, की आपल्याला अनेक गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही, तर केवळ त्याच एका गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करा, आणि त्याच एका गोष्टीत प्रावीण्य मिळविण्यासाठी दिवसरात्र झटत रहा आणि बघा एक ना एक दिवस यश तुमचंच असेल.

जसं रोनाल्डोसाठी फुटबॉल, दलाईलामांसाठी विश्वशांती तसंच तुमचं एक उद्दीष्ट शोधा आणि त्यातच सातत्याने प्रगती करत रहा. स्वतःला रोज हा प्रश्न विचारत रहा की ती एक कोणती गोष्ट आहे जी मला करायला आवडेल.. आणि त्याच गोष्टीसाठी प्रयत्न करत रहा.

2. द डॉमिनो इफेक्ट -

ज्याप्रमाणे एका लहानशा डॉमिनोच्या धक्क्याने आपल्या पुढच्या सगळ्या अधिक वजनी डॉमिनोला खाली पाडू शकतात, त्याप्रमाणे सातत्याने कोणतीही गोष्ट केली तर आपणही आपलं कितीही मोठं ध्येय असेल तर ते नक्कीच साध्य करू शकतो हे यामध्ये सांगितलेलं आहे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

3. तीन सर्वात मोठी मिथकं -

अशी तीन मिथकं आहेत, ज्याबाबत लेखकाने यामध्ये वाचकांना मार्गदर्शन केलेलं आहे. पहिलं मिथक म्हणजे, सगळं काही समान प्रमाणात गरजेचं असतं याबाबत लेखक म्हणतात, की सामाजिक न्याय आणि मानवी हक्क यासाठी ही गोष्ट खरोखरीच खूप गरजेची आहे मात्र पर्सनल लाईफमध्ये ही गोष्ट तितकीशी महत्त्वाची नाही. समानता हे एक मिथक आहे. दुसरं मिथक म्हणजे मल्टीटास्कींग करणं म्हणजे तुमची उत्पादनक्षमता अधिक असणं. लेखक म्हणतो हे देखील एक मिथकच आहे कारण मानवी मेंदू एकाच वेळी दोन कामावर नीट फोकस करू शकत नाही हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालेले आहे, मात्र अनेकजणांना ते मान्य नाही व ते मल्टीटास्कींग करत रहातात. याचा परिणाम होतो की त्यांना एकतर रिझल्ट मिळत नाहीत किंवा त्यांना खूप वेळ लागतो. आणि तिसरं मिथक म्हणजे, एक संतुलित आयुष्य .. जर तुम्ही रोजच्या कामातच स्वतःला व्यस्त ठेवलंत तर तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी कमी वेळ मिळेल .. म्हणून दोन्हीही गोष्टी संतुलितपणे करू शकतो हे देखील एक मिथकच आहे हे लक्षात ठेवा.

आणखीही अन्य अनेक मुद्द्यांचा विचार लेखकाने या पुस्तकात मांडला आहे व त्यामुळे आपल्याला आपल्या उद्दीष्टांप्रत पोचण्याची निश्चित दिशा मिळू शकते हेच महत्त्वाचे आहे.. !

The one thing हे पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/theonething

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com