या भारतीय डॉक्टरमुळे जगभरातील 70 करोड लोकांचे प्राण वाचले !

मित्रहो, या चित्रात जे डॉक्टर दिसत आहेत त्यांच्यामुळे आतापर्यंत जगातील 70 करोड लोकांचे प्राण वाचलेत असा अंदाज आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याच देशातल्या या असामान्य माणसाबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. हे आहेत डॉक्टर दिलीप महालनबीस

त्यांच्या कल्पनेतून आलेल्या एका औषधाचा आपण सर्वांनीच कधी ना कधी वापर केलेला आहे. गेल्या आठवड्यात कोलकात्यामध्ये डॉक्टर दिलीप यांचे निधन झालं आणि त्याबद्दल ना टीव्ही चॅनल्सवर काही बातम्या आल्या ना सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल काही बोललं गेला. त्यांच्याबद्दल एक आर्टिकल मी नुकताच वाचलं आणि म्हणून मला देखील पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल माहिती झाली तीच तुमच्याबरोबर शेअर करतोय.

1971 च्या बांगलादेश म्हणजेच तेव्हाच्या ईस्ट पाकिस्तान च्या युद्धाच्या वेळची ही गोष्ट. युद्धामुळे अनेक निर्वासित नागरिक बॉर्डर वरील रेफ्युजी कॅम्प मध्ये जमा होत होते आणि प्रत्येक रेफ्युजी कॅम्प प्रमाणे या कॅम्पमध्ये देखील प्रचंड गर्दी, अस्वच्छता, चांगल्या पाण्याची कमतरता आणि त्यामुळेच साथीचे आजार यांचं राज्य पसरलं होतं. प्रामुख्याने कॉलरा आणि अतिसार या आजारांनी रेफ्युजी कॅम्प मधील लोक आजारी पडत होते. एकूण माणसांची संख्या पाहता मेडिकल स्टाफ कमी पडत होता आणि औषधांची देखील कमी भासत होती.

अतिसारासाठी सलाईन लावले जायचे (IV). मात्र सलाईनची संख्या आणि ते लावण्यासाठी डॉक्टरांची, मेडिकल स्टाफची संख्या खूपच कमी पडत होती. डॉक्टर दिलीप महालनबीस तेव्हा या कॅम्पमध्ये सुपरवायझर होते. डॉक्टर आणि सलाईन्सच्या कमतरतेवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यासाठी त्यांच्या डोक्यात विचार चालू होते. कोणत्याही मेडिकल स्टाफच्या मदतीशिवाय सहजपणे देता येईल असं एखादं सोल्युशन शोधण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला आणि लवकरच जॉन होपकिन्स मेडिकल रिसर्च सेंटरच्या मदतीने त्यांनी असं सोल्युशन बनवलं देखील. यामध्ये मीठ,बेकिंग सोडा आणि कमर्शियल ग्लुकोज वापरून त्यांनी एक सोल्युशन तयार केले जे पेशंटला स्वतःहून पिणे शक्य होते.

या सोल्युशन चा वापर केल्यानंतर दोन आठवड्यातच 30% मृत्यू दर कमी होऊन 3.6% इतका झाला. ही तर केवळ सुरुवात होती. इतक्या कमी किमतीत इतकं प्रभावी औषध डॉक्टरांना माहिती झाल्यानंतर जगभरात सगळीकडे कॉलरा आणि अतिसारासाठी ते वापरलं जाऊ लागलं. लवकरच WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने हे सोल्युशन जगामध्ये सगळीकडे कॉलर आणि अतिसारासाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले.

मित्रांनो, या सोल्युशनचं नाव आहे ORS (Oral Rehydration Solution). आजही डॉक्टर्स पेशंट्स ना ORS घेण्यासाठी सांगतात.

=========================
✅ रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा dead brand का विकत घेतला ?
✅ अदानी ग्रुप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे का?
✅ 4000 करोडचा घोटाळा ज्याबद्दल कोणीच काही बोलत नाही !
✅ खिशाला परवडतील अशा खऱ्या हिऱ्यांची बाजारपेठ (Lab grown diamonds)
✅ जपान मध्ये तरुणांनी अधिक दारू प्यावी म्हणून तिथलं सरकार प्रयत्न करतंय ! का ते जाणून घ्यायचंय ?
✅ परदेशातील बँकांना पण UPI का वापरायचं आहे?
या व अशा अनेक विषयांवर लेख प्रकाशित होणार आहेत नेटभेट च्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ! आजच जॉईन करा. 93217 13201 या नंबर वर JOIN असा whatsapp मेसेज पाठवा !
=========================

हळूहळू अनेक कंपन्यांनी आपल्या ब्रँडने ORS विकायला सुरुवात केली. ORS ची लाखो डॉलरची इंडस्ट्री तयार झाली. एवढेच नव्हे तर ORS हे नाव वापरून अनेक fake औषध देखील मिळायला सुरू झाली. अगदी जॉन्सन अँड जॉन्सन सारखी कंपनी ORSL नावाचं एक स्पोर्ट्स ड्रिंक विकते, जे मुळात ORS फॉर्मुलाप्रमाणे नाहीच आहे मात्र तरीही नावातील साधर्म्यामुळे लोक ORS समजून ते विकत घेत आहेत.

मात्र, या सगळ्यांमध्ये डॉक्टर महालनबीस यांचा सगळ्यांनाच विसर पडला. असो, आता या लेखाच्या निमित्ताने तरी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती झाली आहे आणि त्यांच्या या संशोधनाचे व जगातील करोडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टरांचे आपण स्मरण करूया !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy