मानसिक थकवा दूर करण्यासाठी या 4 गोष्टी करा

बरेचदा असं होतं की आपल्याला मानसिक थकवा येतो. त्यामागचं कारण काहीही असू दे पण मनाला उभारी वाटत नाही, काहीच करावसं वाटत नाही, किंवा कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही.. फक्त निवांत बसून रहावं, नि डोक्यात कोणतेच विचार नसावेत एवढीच आपली इच्छा असते. हा मानसिक थकवा दूर करण्यासाठी या 4 गोष्टी करून पहा - 

1. दैनंदिन जीवनात सुसुत्रता आणा - 

तुमचा भवताल आणि तुमचं मन दोन्हीही वेळोवेळी स्वच्छ करीत जा. त्यातील गोष्टी नेहमी सुसुत्रबद्धतेने ठेवलेल्या असतील याकडे लक्ष द्या, त्यासाठी तुमच्या कामांचं नीट नियोजन करण्याची सवय लावा. 

2. छोटे छोटे ब्रेक घ्या - 

शॉर्ट ब्रेक असो वा एखादी चार दिवसांची छोटी सुट्टी असो, ती घ्या... मानसिक थकवा दूर करण्यासाठी कामातून ब्रेक्स घेणं फार महत्त्वाचं असतं. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं असतं. 

3. ध्यान लावण्यास शिका - 

तुमच्या व्यस्त दिनक्रमातूनही दररोज किमान 20 मिनीटे ध्यान लावून बसा. अभ्यासांती असे आढळून आले आहे की ध्यानधारणा केल्याने तुमचा फोकस स्पष्ट रहातो. आणि दुसरं म्हणजे तुमचं शरीरही थकव्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागतं. 

4. ताण घेऊ नका - 

सगळीच काम एकटीने, वा एकट्यानेच करायला धावू नका. कामांचं व्यवस्थापन करा. त्यासाठी प्रोफेशनल मदत लागल्यास जरूर घ्या. मनावरचा ताण दूर करा.