कीबोर्डच्या शॉर्टकट कीज वापरून बना कीबोर्ड मास्टर (#Techie_Tuesday)

आपल्याला कीबोर्डच्या अनेक शॉर्टकट कीज माहिती नसतात, मात्र त्या माहिती असल्या तर आपला बराच वेळ वाचू शकतो आणि आणखी फास्ट टायपिंग करता येऊ शकते. म्हणूनच आज जाणून घेऊया अशा दहा शॉर्टकट कीज किंवा कीबोर्ड कमांड्स ज्या खूपच उपयुक्त आहेत.

1. डिलीट/ बॅकस्पेस

बॅकस्पेसचा वापर टेक्स्टला मागच्या बाजूने एकेक कॅरेक्टर डिलीट करण्यासाठी केला जातो. तर डिलीट कीचा वापर करून पूर्ण फाईल, फोल्डर किंवा टेक्स्ट डिलीट करण्यासाठी होतो. हा फरक अनेकांना माहिती नसतो.

2. अल्टर + टॅब

एकाच वेळी जर अनेक प्रोग्राम्स, अनेक विंडोज जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर वा कम्प्यूटरवर ओपन करून ठेवलेल्या असतात तेव्हा एकावरून दुसऱ्या फाईलला, दुसऱ्या विंडोला ओपन करण्यासाठी ही कमांड वापरून तुम्ही स्विच करू शकता.

3. Alt + F4

एखादा प्रोग्राम बंद करण्यासाठी ही कमांड वापरता येते. जे काम तुम्ही करत आहात ते बंद करण्यासाठी ही कमांड देता येते.

4. Window D

ही कमांड वापरून तुम्ही चटकन डेस्कटॉपवर जाऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही काही काम करताय तुमच्या लॅपटॉपवर आणि तुम्हाला डेस्कटॉप ओपन करायचाय, तर अशा वेळी ओपन असलेल्या सगळ्या विंडोज एकेक करून मिनीमाईझ करायची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही सरळ ही कमांड देऊन सगळ्या ओपन असलेल्या विंडोज, टॅब्स एकावेळी मिनीमाईझ करू शकता तसंच पुन्हा तीच कमांड देऊन त्या ओपनही करू शकता.

5. F 12 / control S / control N

एम एस ऑफीस वापरताना या तिन्ही कमांड फार महत्त्वाच्या ठरतात. यातील एफ 12 आणि कंट्रोल एस या कमांडने तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट तत्काळ सेव्ह करू शकता तर, जर तुम्हाला नवीन फाईल ओपन करायची असेल तर त्यासाठी कंट्रोल एन ही कमांड वापरू शकता. त्यामुळे झटकन तुमच्या समोर नवी ब्लॅंक फाईल ओपन होईल.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

6. Ctrl+D -

नवीन टॅब ओपन करण्यासाठी आपण ब्राऊजरच्या वरच्या मेन्यूमध्ये जी प्लस ची खूण दिसते त्यावर क्लिक करून आपण नेहमी नवीन टॅब आपल्या ब्राऊझरमध्ये ओपन करतो मात्र, तसं करण्याऐवजी तुम्ही कंट्रोल टी दाबूनही नवी टॅब सहज ओपन करू शकता.

7. Ctrl + H -

आपल्या कंम्प्यूटरची हिस्ट्री डिलीट करण्यासाठी वारंवार सेटिंग्जमध्ये जाऊन हिस्ट्री ऑप्शनवर क्लिक करून त्यानंतर ती डिलीट करण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही जर कंट्रोल एच कमांड दिलीत तर लगेचच तुमच्या पुढ्यात तुमची ब्राऊझिंग हिस्ट्रीची विंडो ओपन होईल आणि क्षणात तुम्ही डेटा क्लीन करू शकता.

8. कंट्रोल + शिफ्ट + टी (Ctrl+ Shift +T ) -

जेव्हाही अनेक टॅब्स ओपन केलेले असतात, तेव्हा अचानक जर तुम्ही बंद करू लागता आणि नेमकं महत्त्वाचा टॅब क्लोज केला जातो, तेव्हा ही कमांड दिल्यानंतर लगेचच तीच टॅब ओपन होईल

9. कंट्रोल+अल्टर+डिलीट (Ctrl+Alt+Delete) -

जेव्हा तुमची सिस्टीम हँग होते तेव्हा या तिन्ही कीज एकदम दाबून कमांड दिली की तुम्हाला ज्या प्रोग्राममुळे तुमची सिस्टीम हँग झाली आहे, त्या प्रोग्रामचा तो टास्क बंद करून टाकू शकतो, त्यामुळे तुमची सिस्टीम पूर्ववत काम करू लागते.

10. कंट्रोल झेड (Ctrl Z) आणि कंट्रोल वाय (Ctrl Y)

अन-डू आणि री-डू करण्यासाठी या शॉर्टकर्ट कीज खूप उपयोगी पडतात. कंट्रोल झेड मुळे तुम्ही अन-डू करू शकता, तर कंट्रोल वायमुळे तुम्ही री-डू करू शकता.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com