जे पेराल तेच उगवेल .. (#Monday_Motivation)

जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर औदार्य अंगी बाणवा.

जर तुम्हाला मित्र हवे असतील, तर आधी स्वतः मैत्रीपूर्ण व्हा.

जर इतरांनी तुम्हाला समजून घ्यावे असे वाटत असेल तर आधी तुम्ही स्वतः इतरांना समजून घेण्यासाठी वेळ काढा..

जर तुमचं म्हणणं इतरांनी ऐकावं असं वाटत असेल तर आधी इतरांचं म्हणणं ऐकायला शिका.

जर तुमचं आयुष्य अधिक रंजक असावं असं तुम्हाला वाटत असेल तर भवतालच्या रंजक घडामोडींमध्ये रस घ्यायला शिका.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

जर तुम्हाला एखादं कौशल्य शिकून त्यात पारंगत व्हायचं असेल तर, त्या कौशल्यातील जे जे शिकता येईल ते ते आधी स्वतः शिका आणि मग इतरांना तुम्हाला त्याबाबत जे जे माहिती आहे ते सांगा.

जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आधी स्वतः शांततापूर्ण वागा आणि सुसंवाद साधायला शिका.

जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर आधी स्वतःपासून सुरुवात करा.

तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला कालांतराने परत मिळत असतं.

जे जे तुम्हाला आयुष्यात हवंय ते ते आधी इतरांना द्यायला शिका, त्या गोष्टीची जोपासना करा, तुमच्यात त्या गोष्टी बाणवा आणि आधी तुम्ही स्वतः तसे व्हा.. बघा, तुम्ही ज्याची अपेक्षा केली होती ते सगळं तुम्हाला भरभरून परत मिळतं की नाही !

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com