आत्मविश्वासपूर्ण जेव्हा वाटत नाही तेव्हा काय करायचं ?

बरेचदा असं होतं, की आपल्या कामाच्या तुलनेत आपल्याला त्याचं तितकंस श्रेय मिळत नाही, किंबहुना कधी कधी त्या कामाचा पुरेसा आर्थिक मोबदलाही मिळत नाही. अशावेळी आपसूकच मनाला बरं वाटत नाही शिवाय आपण मनोमनी खंतावतो. पुढील नवीन कामांसाठी आपल्या मनाला पुरेशी प्रेरणाही मग मिळत नाही. आपलं मन खट्टू होतं. याउलट जर कमी श्रमात भरपूर आर्थिक मोबदला मिळाला तर कोणाला नकोय शिवाय त्याने आपल्याला अधिकाधिक जोमाने काम करण्याची प्रेरणाही मिळते. तुम्हाला आज आम्ही अशा काही छोट्या गोष्टी सांगणार आहोत की त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होईल, तुमचं मन खट्टू होईल तेव्हा तेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून पुन्हा तुमच्यात आत्मविश्वास नि प्रेरणा जागवू शकाल -

1. रोजची कामे लिहून काढा -
दररोज तुम्ही त्या त्या दिवशी जे जे काम करायचं ठरवलं असेल त्या कामांची एक नीट यादी लिहून काढा. हा उपाय अतिशय जादूईरित्या काम करतो बरं का, ही गोष्ट वरवर पहाता खूप साधी आणि बिनमहत्त्वाची वाटू शकते पण प्रत्यक्षात तसं नाहीये. अशी यादी करून त्यानुसार जेव्हा तुम्ही सगळी काम करता तेव्हा काय होतं माहितीये -
लक्षात ठेवणं सोपं होतं आणि सगळी शक्ती ती काम पूर्म करण्यात वापरली जाते.. आणि त्यामुळे सगळी काम शक्यतो पूर्ण करूनच आपण थांबतो.. पर्यायाने आपला आत्मविश्वास दुणावत जातो.


2. अवघड गोष्टी आधी करा -
जसा जसा दिवस कलतो, तसंतसं तुमचा काम करण्याचा उत्साह देखील कमी कमी होत जातो. शिवाय, अशातच जर फार अवघड अवघड कामं हातावेगळी झालेली नसतील तर आणखीनच टेन्शन यायला लागतं. म्हणूनच, असं करा, की सगळ्यात कठीण काम दिवसाच्या सुरुवातीलाच संपवून मोकळे व्हा..आणि त्यानंतर छोट्या छोट्या कामांसाठी वेळ द्या असं करताच तुम्हाला बरं वाटेल, तुमच्यावर ताण येणार नाही आणि तुमचा उत्साह टिकून राहील.


3. लक्ष्य केंद्रीत करा -
जे काम करायचंय त्यावर नीट लक्ष्य केंद्रीत करा. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र करण्यासाठी एक तास लागतो पण मन विचलीत होण्यासाठी एखादं नोटीफिकेशनही पुरेसं असतं. म्हणूनच, वारंवार लक्ष्य विचलीत होत असेल तर तसं करू नका. तुमच्या कामावर नीट लक्ष्य केंद्रीत करा.


4. मोठ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पूर्ण करा -
जर तुमच्या कामाच्या यादीत काही मोठी कामं असतील तर त्यांचं विभाजन करा. ती कामं टप्प्याटप्प्याने पूर्ण करा.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================


5. कामाचं स्वातंत्र्य घ्या -
जेव्हा आपलं आपल्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण असतं तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. मात्र, जेव्हा आपल्याला कामाचं स्वातंत्र्य नसतं, तेव्हा आपल्याला बरं वाटत नाही. म्हणूनच, आपल्या कामाचं स्वातंत्र्य मिळवा. त्यासाठी हवंतर तुमच्या मॅनेजर्सशी वा वरिष्ठांशी बोला. तुमच्या काम पूर्ण करण्याच्या पद्धतींबाबत त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही कामातलं जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळवा.


6. एखादं काम का करायचं याचं उत्तर आधी मिळवा -
जेव्हा तुम्हाला नेमकं माहिती नसतं, की एखादं काम का करायचंय तेव्हा तुम्हाला ते काम करण्यात फार वेळ लागतो, किंवा फार रस वाटत नाही. म्हणूनच, एखादं काम का करायचंय हे आधीच स्वतःशी स्पष्ट करून घ्या आणि मगच ते काम करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला ते काम करण्यात अधिक उत्साह वाटेल.


7. पुरेशी झोप घ्या -
निरूत्साही वाटण्यामागे बरेचदा पुरेशी झोप न होणं हे देखील कारण असतं. झोप पुरेशी झाली नसेल तर तुम्हाला कामावर लक्ष्य केंद्रीत करणं फार कठीण जातं. हेच जेव्हा तुमची झोप पूर्ण झालेली असते तेव्हा तुम्हाला अधिक उत्साही वाटतं.


8. स्वतःच स्वतःला द्या कौतुक आणि बक्षिस -
एखाद्या कामातून जर तुम्हाला कौतुकाची थाप मिळाली किंवा एखादं छोटं मोठं बक्षीस मिळालं तर किती बरं वाटतं नै.. ? पण दैनंदिन जीवनात अशी बक्षीसं वा कौतुकाची थाप आपल्याला कोण देणार ? मग हे काम स्वतःच स्वतःसाठी करायला हवं.. बरेचदा आपणच स्वतःचं कौतुक करत नाही, किंवा स्वतःला छोटीमोठी पावती म्हणून काही बक्षीस देत नाही, आपण स्वतःलाच विसरतो. म्हणूनच.. दरवेळी जेव्हा तुम्ही कोणतंही काम यशस्वी कराल, तेव्हा स्वतःच स्वतःला बक्षीस द्या.. हे बक्षीस म्हणजे एखादं चॉकलेटही असू शकतं किंवा कधीमधी छोटासा नाश्ताही .. पण तो स्वतःचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी खूप मोठी मदत आपल्याला करतो बरं का.. !


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com