जेव्हा पेप्सीची मार्केटींग स्ट्रॅटेजी ठरली होती जीवघेणी ...!

बिझनेस मार्केटींगसाठी अनेक कंपन्या निरनिराळी शक्कल वापरत असतात. मार्केटींग करताना बिझनेसेसने जर सावधानता आणि पुरेशी दक्षता वापरली नाही तर किती भयंकर प्रसंग ओढावू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे 1992 मध्ये पेप्सी कंपनीने फिलीपाईन्समध्ये केलेलं एक मार्केटींग कँपेन !

फिलीपाईन्समध्ये पेप्सी कंपनीने नंबर फीव्हर नावाचं एक मार्केटींग कँपेन केलं. हे कँपेन करताना कंपनीकडून एक चूक झाली आणि त्यामुळे मार्केटींग कँपेन पूर्णतः अयशस्वी झालं, इतकंच नव्हे तर या कँपेनच्या विरोधात जनउद्रेक इतका प्रचंड होता की लोक चिडले आणि संपूर्ण प्रकरण चिघळलं. अक्षरशः पाच जणांचा जीवही गेला. ही थरारक घटना पेप्सीच्या इतिहासातील काळा दिवस ठरली. 

ब्रँडींग, मार्केटींग करताना किती सावधानता पाळायला हवी हेच या उदाहरणातून शिकायला मिळतं. किंबहुना वरवर अगदी सहज सोपं साधं वाटणारं हे मार्केटींगचं काम प्रत्यक्षात किती जबाबदारीचं आणि महत्त्वाचं आहे हे देखील या उदाहरणातूनच शिकायला मिळतं. 

काय होती ही घटना आणि काय झालं होतं नेमकं त्यावेळी ... चला जाणून घेऊया आजच्या या पोस्टमधून !
धन्यवाद
टीम नेटभेट