मार्केटींग अधिक प्रभावी करण्यासाठी समजून घ्या ही मानसशास्त्रीय 10 तत्व (#Buz_Thirsday)

मार्केटींग अर्थात विपणन हे अलीकडच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. यामुळे तुमचा वा तुमच्या उत्पादनांचा, तुमच्या कंपनीचा वा तुमच्या व्यवसायाचा प्रभाव कैक पटींनी वाढतो, यात शंका नाही. म्हणूनच, मानवी मनाची आणि भावभावनांची जर तुम्हाला नीट जाण असेल तर तुम्ही सायकॉलॉजीतील ही तत्व वापरून केलेलं मार्केटींग हे निश्चितच अधिक प्रभावी ठरेल यात शंका नाही.

1. परस्पर सहकार्य -

जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याला मदत करते तेव्हा अशा व्यक्तीला परतफेड करायची विसरू नका.

उदा. जेव्हा वेटर तुम्हाला फ्री मिंट्स ऑफर करतो तेव्हा त्याची टिप 14 टक्क्याने (अर्थात, नेहमीपेक्षा अधिक टीप त्याला द्यावी) वाढते हे लक्षात ठेवा.

2. आपल्या नेत्याप्रमाणे वागण्याची इच्छा -

लोकांना नेहमीच त्यांच्या आवडत्या प्रभावशाली व्यक्तीप्रमाणे वागायला आवडते. ते नेहमीच त्यांच्यावर प्रभाव असलेल्या नेत्याची नक्कल करत असतात. तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर ही बाब तुम्हाला अनेक ठिकाणी जाणवेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पाहिलं असेल तर बरेच athletes हे लीब्रोन आणि रोनाल्डोप्रमाणे नाईके कंपनीचेच शूज घालतात. आणि हीच बाब ओळखून कंपनीसुद्धा या बड्या खेळाडूंना आपली उत्पादनं वापरण्यासाठी पैसे देते.

3. जोखीम टाळणे -

आपण बरेचदा खरेदी करायचंच टाळतो, कारण आपल्याला भीती असते की आपण एखादं उत्पादन वा सेवा घेऊ आणि नंतर ती सेवा वा उत्पादन आपल्या पसंतीस उतरलं नाही तर आपले पैसे वाया जातील व नाहक मनस्ताप होईल तो वेगळाच.

ही सायकॉलॉजी ओळखूनच आता नेटफ्लिक्स आणि स्पॉटीफाय सारख्या कंपन्या आधी फ्री ट्रायल्स देऊ करू लागल्या आहेत, म्हणजेच ग्राहकांची जोखीम टाळण्याची कंपन्यांनी काळजी घेतली आहे.

4. पत वाढवणे -

लोक नेहमी अशी उत्पादनं खरेदी करतात जी त्यांची सामाजिक पत व प्रतिष्ठा वाढवेल आणि त्यासाठी ते कितीही मोठी रक्कम खुशीने मोजायला तयार असतात.

उदा. - फरारी, गुसी बॅग्स.

5. अनिश्चितता टाळणे -

लोकांना वाट पहाण्याचा नेहमी कंटाळा येतो, तसंच नेमका किती कालावधी एखाद्या गोष्टीकरीता लागेल याची अनिश्चितता असली की लोक बेचैन होतात. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की हल्ली बऱ्याच ट्राफीक सिग्नल्सलाही टायमर लावलेले असतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर उबेर ईटच्या एपवरही तुमची ऑर्डर किती वेळात तुमच्यापर्यंत येईल हे आधीच स्पष्ट केलेलं असतं, हल्ली अनेक अशा एप्सने अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

6. अँकरिंग -

लोकांना नेहमी जास्त पैसे खर्च करायला आवडतात, आणि जेव्हा दोन वेगवेगळ्या किंमती एकाच वेळी समोर येतात तेव्हा तर ते निश्चितच मोठ्या किंमतीची खरेदी करण्यास प्रभावीत होतात.

कुठेही पाहिलंत तर सेलमध्ये नेहमीच ही सायकॉलॉजी आपल्यावर काम करते आणि हे ओळखूनच सेलमध्ये नेहमी अशाप्रकारे किंमती लिहीलेल्या असतात -

Original Price - 500 $
Sale Price - 300 $

अशावेळी आपसूकच सेलच्या किंमतीला खरेदी करताना लोकांना थोडासा कमीपणाच वाटतो आणि मग ते मोठ्या रकमेची खरेदी आनंदाने करतात.

7. अभाव -

जेव्हा एखाद्या गोष्टीची दुर्मिळता किंवा अभाव निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे लोकांना जाणवते तेव्हा ते तातडीने ती वस्तू खरेदी करतात. यालाच FOMO म्हणतात अर्थात, Fear of Missing Out

म्हणूनच, बरेचदा कोणत्याही गोष्टीचं मार्केटींग करताना हे एक वाक्य हमखास वापरल्याचं तुम्हीही ऐकलं असेल -"Buy now while sales last"

8. Halo effect -

तुमच्या पहिल्या बोलण्यातच समोरचा नेहमी एकतर तुमच्याकडे आकर्षित होतो किंवा तुमच्यापासून दूर जातो. म्हणूनच, तुम्ही पाहिलं असेल, अनेक कंपन्यांच्या जाहिरातीत, किंवा विक्रीच्या स्टॉल्सवर छान, आकर्षक बोलणाऱ्या, दिसणाऱ्या महिला, मुली वा प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुरूष, तरूण नियुक्त केलेले असतात. ते ग्राहकांना पहिल्या फटक्यात केवळ छान स्मितहास्य देऊन किंवा सकारात्मक पद्धतीने बोलून प्रभावीत करतात आणि त्यामुळे कंपनीचा ग्राहकाशी एक चांगला सकारात्मक बंध तिथेच निर्माण होतो.

9. सामाजिक प्रभाव -

एखादी वस्तू आपल्या मैत्रिणीने घेतली म्हटलं की ती वस्तू हमखास आपल्यालाही लगेच घ्यावीशी वाटते ही साधी सायकॉलॉजी ओळखून आपण काम करू शकता. हल्ली बऱ्याच कंपन्या तुम्हाला त्यांच्या सेवांविषयी, उत्पादनांविषयी रिव्ह्यू लिहायला सांगतात, याचं कारणंच ते आहे. कारण, जेव्हा तुमचा रिव्ह्यू इतर लोक वाचतात तेव्हा त्यांना आपोआपच ती वस्तू वा सेवा विकत घेण्याची, वापरून पहाण्याची तीव्र इच्छा होते.

10. अधिकार -

जेव्हा एखाद्याची पूर्ण माहिती नसते तेव्हा लोक त्या त्या क्षेत्रातील अधिकार असलेल्या जाणकार व्यक्तीला त्याबाबत विचारणा करणे पसंत करतात. उदाहरणार्थ, अनेक टूथपेस्ट्सच्या जाहिरातीत तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या दंतवैद्याचं रेकमेंडेशन आवर्जून दाखवलेलं असतं, जेणेकरून लोकांना विश्वास बसावा आणि लोकांनी ते उत्पादन, त्या कंपनीची टूथपेस्ट विकत घ्यावी.

आणि वरील सर्व 10 मुद्द्यांबरोबरच हल्ली आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड आलाय, की आपल्या प्रमाणे आणखी कोण लोक आहेत हे शोधण्यासाठीही हल्ली लोक उत्पादनं वा सेवा तद्नुरूप शोधत असतात, वा वापरत असतात. टेस्ला ड्रायव्हर्सचा ट्रायबल बाँड हे एक उत्तम उदाहरण देता येईल.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com