There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
काही वर्षांपूर्वी एका मासिकात एक गोष्ट वाचली होती. नेमकी कुठे ते आठवत नाही ..पण गोष्ट चांगलीच लक्षात राहिली.
एकदा एका गावात बाहेरील प्रांतातून एक व्यापारी आला. व्यापाऱ्याने गावकऱ्यांना सांगितले की जो मला माकड पकडून आणून देईल त्याला मी प्रत्येक माकडाचे १ ० ० रुपये देईन . गावकऱ्यांनी आजूबाजूच्या जंगलातून पकडून पकडून माकडं आणली आणि १ ० ० रुपयांना विकून पैसे कमावले. चांगली कमाई होत आहे बघून गावकरी प्रचंड खुश होते. पण लवकरच माकडे मिळणे कठीण होत गेले. जवळपास सगळीच माकडं विकली गेली होती.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================
काही दिवसांनी आणखी एक व्यापारी तिथे आला आणि त्याने सांगितलं की मला आणखी माकडं पाहिजे आहेत. मी तुम्हाला प्रत्येक माकडामागे ३ ० ० रुपये द्यायला तयार आहे.
या गावातील माकडे तर संपली होती. म्हणून गावकऱ्यांनी पहिल्या व्यपाऱ्याकडून माकडे १ ५ ० -२ ० ० रुपयांना विकत घ्यायला सुरुवात केली. कारण १ ५ ० ला घेऊन ३ ० ० ला विकायचं आणि १ ५ ० चा नफा मिळवायचा हे सोपं गणित होतं.
पण...या खेपेला तो दुसरा व्यापारी परत आलाच नाही. गावकऱ्यांनी माकडं आणून बंदिस्त करून ठेवली होती. त्यांना खाणं देण्यात आणखी पैसे खर्च होत होते. आणि उपद्रव व्हायचा तो वेगळाच. खूप दिवस वाट पाहून शेवटी काही लोकांनी माकडं पुन्हा जंगलात सोडून दिली. काही लोक अजूनही व्यापारी येतील या आशेवर माकडं सांभाळत होती आणि त्यांचा त्रास सहन करत होती.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================
त्याच वेळी दुसऱ्या गावातही अशीच घटना घडली होती. तिथेही एक व्यापारी गेला होता. फरक एवढाच होता की त्याने माकडाऐवजी शेळ्यांची मागणी केली होती. तिथेही आपणच विकलेल्या शेळ्या गावकरयांनी चढ्या भावाने विकत घेतल्या होत्या. आणि आता त्यांच्याकडे शेळ्या होत्या पण विकत घेणारा व्यापारी पुन्हा आलाच नाही.
पण दुसऱ्या गावातले लोक तेवढे दुर्दैवी नव्हते. शेळ्या माकडांपेक्षा खूपच बऱ्या होत्या. त्यांच्यापासून दूध मिळायचं, शेतीला खत मिळायचं आणि मटणही मिळायचं. त्यामुळे त्यांनी शेळ्या सांभाळल्या आणि त्यांना लगेच नाही पण पुढे शेळ्यांचा फायदा झाला.
आज शेअर मार्केट मध्ये अनेक माकड कंपन्या (Useless) आणि शेळी कंपन्या (Valuable) चढ्या भावात मिळत आहेत. जर चढ्या भावात घेऊन आपल्यापेक्षा जास्त भावात घ्यायला कोणी व्यापारी येईल या आशेवर असाल तर एवढं करा....निदान माकडं नको तर शेळ्याच घ्या !!